Devendra Fadnavis : गनिमी कावा केला अन् किल्ला परत आणला…

Devendra Fadnavis : गनिमी कावा केला अन् किल्ला परत आणला…

Uddhavji, in his lust for the seat, allied himself with the Congress NCP : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP alliance) पुन्हा तुटली. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP)पाठिंब्यावर महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली आणि भाजपला (BJP) विरोधी बाकावर बसवले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे गट-भाजप आणि ठाकरे गट यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र झाला. भाजप आणि ठाकरे गटाकडून रोज एकमेकांवर सातत्याने टीका केली जाते. दरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्रीपदाच्या आमिषाने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागले, अशा शब्दात उद्धव ठाकरेवर निशाणा साधला.

चाळीस आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं. शिंदेच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. दरम्यान, शिंदेच्या बंडामुळं ठाकरे गटाकडून सातत्याने भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठलली होती. दरम्यान, आम्ही हिंदुत्वासाठी बंड केलं असं शिंदे गटाकडून सांगितलं जातं होतं. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. फडणवीस म्हणाले की, आपल्यासोबत बेईमानी करणाऱ्यांना आपण बाजूला ठेवलं. आपण गमिनी कावा केला आणि आपला किल्ला परत आणला. वैचारिक मित्रांना सोबत घेऊन पुन्हा एकदा – शिवसेना भाजपचं सरकार राज्यात आणलं.

Horoscope 20 May 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने आणि दहा महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या राज्यातील सरकारने सर्व गरीब कल्याणकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत नेऊन शेवटच्या माणसाला लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले सरकार आले आहे. खरं तर 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीला जनतेने निवडून दिले होते. पण खुर्चीच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाकडे आकृष्ट झाले. आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला लागले. पण, हा इतिहास आहे की, जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागतो, त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“उद्धवजींनी खुर्चीच्या लालसेपोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संग केला, हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. याचा परिणाम असा झाला की, जे आमच्या विचारात होते त्यांनी उद्धव ठाकरेंची सोबत सोडून भाजपसोबत युती केली आणि राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आणले, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube