माझ्या नादाला लागू नका, संजय राऊतांचा राणेंना इशारा
मुंबई : ‘नारायण राणे यांच्यासारखे आम्ही पळकुटे नाही. ईडीची नोटीस येतात पळून जाणारे आम्ही नाही. मी नारायण राणेवर अजून काहीच बोललो नाही. जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग दाखवतो मी. झाकली मूठ सव्वा लाखाची माझ्या नादाला लागू नका. मी हिंमतीसाठी पक्षासाठी जेलमध्ये गेलेलो आहे. ‘
‘तुमच्या हातात न्यायालयाचा कायदा आहे का ? मला जेलमध्ये कसे घालणार ? मला जेलमध्ये कोण कोण घालणार व काय काय बोलत आहे तुम्ही. याची सगळी नोंद चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पाठवलेले आहे. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरण काढली तर ते पन्नास वर्षे सुटणार नाहीत.’ असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी नारायण राणेंना दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सामनातील एका अग्रलेख प्रकरणी संजय राऊत यांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावे लागेल अशी टिपण्णी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग दाखवतो मी असा थेट इशारा नारायण राणे यांना दिला आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.