शिवसेनेतील नाराजांना अखेर बाप्पा पावले ! दोन माजी खासदार व आमदाराला महामंडळ

  • Written By: Published:
शिवसेनेतील नाराजांना अखेर बाप्पा पावले ! दोन माजी खासदार व आमदाराला महामंडळ

Eknath Shinde Appointed three leader on Corporation : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election Election 2024) तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाराज नेत्यांना खुश केले आहे. नाराज असलेले माजी दोन खासदार आणि मंत्रीपदासाठी प्रयत्न करून ते पद न मिळालेले एक आमदार या तिघांना तीन महामंडळे दिले आहेत. तीनही महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा आहे. यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना ताकद दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या नेत्यांनी जोमाने काम केलेस पक्षाला फायदा होईल, हे मागे गणिते आहेत.


… तर OTP मुळे तुमचे बँक खाते रिकामे होणार, सरकारने दिला इशारा

लोकसभेला माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) माजी खासदार हेमंत पाटील यांना डावलण्यात आले होते. आनंदराव अडसूळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या दोघांना महामंडळ देण्यात आले आहे. आनंदराव अडसूळ हे राज्यपाल होण्यासाठी इच्छुक होते. तर पक्ष प्रवक्ते म्हणून ठाकरे गटावर तुटून पडणारे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांना अखेरपर्यंत मंत्रिपद मिळू शकले नाही. आता त्यांना महामंडळ देण्यात आले आहे. आनंदराव अडसूळ यांना महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिंगोलीतून तिकीट कापण्यात आलेले माजी खासदार हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे केंद्र हिंगोलीतील वसमत येथे आहे.

…अरे कोंबड्या बघूया तरी तुझ्यात जोर आहे का?, सदाभाऊ खोतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मंत्रिपदाची तहान सिडकोवर
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट हे मंत्रिपदासाठी डोळे लावून बसले होते. विस्तारात मंत्रिपद मिळेल, असे वाटत होते. पण निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊनही मंत्रिमंडळाचे काही विस्तार झाला नाही. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता संपले आहे. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची नाराजी दूर केली आहे. त्यांची सिडको अर्थात शहर आणि औद्योगिक विकास महामडंळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलीय. या पदालाही मंत्रिपदाचा दर्जा आहे.

नाराजांचा फटका नको म्हणून

पक्षातील नाराजांचा फटका विधानसभेला बसू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळीच पावले उचलली आहेत. यवतमाळमधून भावना गवळी यांना लोकसभेचे तिकीट कापले गेले होते. त्यामुळे त्याही नाराज होत्या. पण त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे. तर कृपाल तुमाने यांनाही विधानपरिषदेवर घेतले आहे. आता तिघांना महामंडळे देऊन मुख्यमंत्र्यांनी नेत्यांची नाराजी दूर केलीय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube