राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली!

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली!

मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं वेध लागलं होतं. अखेर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही २ फेब्रुवारूली मतमोजणी होणार आहे. यामध्ये नाशिक अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागासाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नववर्षात होणार आहे. मतदान होणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्यसंख्या ही ७८ आहे. त्यामध्ये आता पदवीधरच्या दोन आणि तीन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यामध्ये आता सामना पाहायला मिळणार आहे.

यासाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार असून यामध्ये नाशिक आणि अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ अशी ही निवडणूक असणार आहे.

सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे हे आमदार होते. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे रणजीत पाटील हे आमदार होते. तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे आमदार होते. तर कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये बाळाराम पाटील आणि नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये नागो गाणार हे आमदार होते.

दरम्यान, आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे या मतदारसंघात कोण निवडुन येणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं असून निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेत्यांच्या हालचाली सुरु झाल्याचं दिसून येत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube