Election Results 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ फुललं! देशभरात कोणत्या राज्यांत भाजपचं सरकार?
Election Results 2023 : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमध्ये (Congress)कॉंटे की टक्कर सुरु आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकालाचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. राजस्थान(Rajasthan), मध्यप्रदेश(Madhya Pradesh), छत्तीसगडमध्ये(Chhattisgarh) भाजपचं पारडं जड होताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपच बाजी मारणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर आजच्या निकालात राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपने विजय खेचून आणल्यास देशातील कोणकोणत्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
‘और कहो पनौती…’, ‘राजकारणातील पनौती पप्पू’; तीन राज्याच्या निकालावरून मजेशीर मिम्स
मध्य प्रदेशमध्ये भाजपला 160 हून अधिक जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा कायम राहण्याची दाट शक्यता आहे. राजस्थानमध्ये भाजप 115 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची चिन्हं दिसत आहेत. छत्तीसगडमध्ये भाजप 54 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचाच विजय होताना दिसत आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला (BRS) मोठा धक्का देत काँग्रेस 64 जागांसह आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
Rajasthan Election : राजस्थानचा जादूगर ‘फेल’, काँग्रेसचं नेमकं कुठं चुकलं?
संपूर्ण देशाचा विचार केला तर सध्या 10 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तसेच भाजप सहा राज्यांमधील सरकारमध्ये सहभागी आहे. चार राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. तर काँग्रेस तीन राज्यांमधील आघाडी सरकारचा भाग आहे. सात राज्यांमध्ये इतर पक्षांची सत्ता आहेत. पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी, तेलंगणामध्ये बीआरएस, आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस, ओडिशामध्ये बीजेडी आणि केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आहे.
देशात कोणत्या राज्यात भाजपचे सरकार आहे?
अरुणाचल प्रदेश – भाजप, एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी)
आसाम – भाजप, एजीपी (आसाम गण परिषद), यूपीपीएल, बीपीएफ (बोडोलँड पीपल्स फ्रंट)
गोवा – भाजप, एमजीपी (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष)
गुजरात – भाजप
हरियाणा – भाजप, जेजेपी, एचएलपी
महाराष्ट्र – भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
मणिपूर – भाजपा
मेघालय – भाजपा
नगालैंड – एनडीपीपी, एनपीएफ, भाजप
पुद्दुचेरी – एआईएनआरसी, भाजप
सिक्कीम – एसकेएम, भाजप
त्रिपुरा – भाजप, आयपीएफटी
उत्तर प्रदेश – भाजप
उत्तराखंड – भाजप
मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पाचपैकी चार राज्यांचे निकाल आज येणार आहेत. मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. राजस्थान आणि छत्तीसगड या पाच राज्यांपैकी दोन राज्यांमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये भाजप, तेलंगणामध्ये बीआरएस आणि मिझोराममध्ये एमएनएफची सत्ता आहे.