Election Results 2023 : भाजपनं जिंकल्याचा दावा करणं हाच मोठा विनोद; राऊतांचा मोदी-शहांना खोचक टोला

Election Results 2023 : भाजपनं जिंकल्याचा दावा करणं हाच मोठा विनोद; राऊतांचा मोदी-शहांना खोचक टोला

Election Results 2023 : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती (Election Results 2023) येत आहेत. तेलंगाणा वगळता राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजप सत्तेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या या यशावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.सुरुवातीपासूनच भाजपाच्या पराभवाचा दावा करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी-शहांना खोचक टोला लगावला आहे. चारही राज्यात जिंकण्याचा दावा भाजपाने केला असेल तर तो एक विनोद म्हटला पाहिजे. यावर्षी मिझोराममध्ये भाजपाा औषधालाही दिसत नाही. नॅशनल फ्रंट किंवा अन्य स्थानिक पक्ष आहेत. त्यांचा निवडणुकीत बोलबोला आहे ते पुन्हा निवडून येतील, असे राऊत म्हणाले.

Rajasthan Elections : 0.74 टक्के मतदान ठरविणार राजस्थानचे राजकीय भविष्य? वाचा इनसाईड स्टोरी

छत्तीसगड, राजस्थानमध्ये बीजेपीचं सरकार येईल ही चुकीची माहीती आहे. हे निकाल सर्व दीड ते दोन वाजेपर्यंत स्पष्ट होतील. आता येत आहे तो कल आहे. छत्तीसगडला नक्कीच काँग्रेस पक्ष जिंकेल. तेलंगनामध्येही काँग्रेस पक्ष जिंकेल. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये अजूनही काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. सकाळी सचिन पायलट आणि कमलनाथ पिछाडीवर आता पाहिलं ते आघाडीवर आहेत. थोडा टाईम लागतो हे यायला सगळे निकाल आल्यावर आपण बोलू असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

थोडं थांबा, सगळजे निकाल येऊ द्या 

मिझोराममध्ये बीजेपी नाही. छत्तीसगडमध्ये देखील बीजेपी नाही आणि तेलंगानामध्ये देखील बीजेपी नाही. राजस्थान आणि मध्यप्रदेशात कांटे की टक्कर चालू आहे. अजूनही निकाल स्पष्ट नाही. हा कल आहे. पाच राज्यांच्या निवडणुका आहेत यामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो तेलंगानामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होईल,असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसचे राज्य येईल. मिझोराममध्ये तिकडील प्रादेशिक पक्ष सत्तेवर येईल. हे तीन निकाल सोडले तर राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये खूप मोठी टक्कर होईल. आता जे समोर आहेत ते कल आहेत. दोन पैकी एका राज्यात मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होईल याची आम्हाला खात्री आहे, असे राऊत यांनी ठासून सांगितले.

Telangana Elections 2023 : तेलंगणातच गुलाबी वादळाला ब्रेक ! काँग्रेस मुसंडी मारणार ?

वसुंधराराजे-शिवराज चौहान यांनाच क्रेडिट 

पाचही राज्यात दावा बीजेपीने केला असेल तर ते एक विनोद म्हणून आपण घ्यायला पाहिजे. याक्षणी मिझोराममध्ये भारतीय जनता पक्ष कुठे औषधालाही दिसत नाही. तिथे मिझो नॅशनल फ्रंट आहे किंवा इतर काही स्थानिक पक्ष आहेत. तेलंगानामध्ये भारतीय जनता पक्ष आता चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला दहा जागाही भेटण्याची शक्यता नाही तेलंगणामध्ये काँग्रेस पुढे आहे. आता विचारायला आहे छत्तीसगड मध्ये काँग्रेसचे सरकार बनवणार मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये यावेळी संघर्ष आहे जोरदार लढाई आहे. काँग्रेस आणि बीजेपीमध्ये जर या दोन राज्यांमध्ये यश मिळालं तर त्याचं श्रेय मोदी किंवा शहांना नसतील ही शक्यता मला कमी दिसत आहे. त्याचे श्रेय असेल मध्यप्रदेशचे शिवराज सिंग चौहान आणि राजस्थानमध्ये वसुंधराराजे शिंदे या दोघांना असेल असे राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube