Engineer Day; शरद पवारांनी सांगितल्या किल्लारी भूकंप काळातील आठवणी

Engineer Day; शरद पवारांनी सांगितल्या किल्लारी भूकंप काळातील आठवणी

Sharad Pawar : मी नेहमी माणसं जोडायचे काम करत असतो. ज्या क्षेत्रातले आपल्याला जास्त समजत नाही. त्या क्षेत्रातले ज्याला ज्ञान आहे तिथ आपण विद्यार्थ्यांसारखे जावे. मी मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, कृषिमंत्री झालो पण माणसाला सर्वच क्षेत्रातले ज्ञान नसते. ज्ञान नाही म्हणून कमीपणा घ्यायचा आणि शिकायची तयारी ठेवायची, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजिनिअर डे कार्यक्रमात सांगितले.

ते पुढं म्हणाले की संरक्षणमंत्री झालो तेव्हा मला आर्मीतले रॅंक माहिती नव्हते. लेफ्लनंट होता का लेफ्लनंट जनरल होता? कॅप्टन होता की मेजर जनरल होता? पण जबाबदारी घेतल्यानंतर सरळ उठलो आणि कोल्हापूरला गेलो. तिथं निवृत्त जनरल थोरात होते. सलग तीन दिवस सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी जायचो आणि संध्याकाळी परत यायचो. एखादा विद्यार्थी ज्ञान घेतो तसा मी त्यांच्याकडून माहिती घेत होतो. त्याचा उपयोग मंत्रालयाचे काम करताना झाला, असे शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवारांनंतर शरद पवारही पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार, पुण्यात ‘या’ तारखेला रोड शो…

इंजिनिअरचे योगदान सांगताना शरद पवार म्हणाले, मी राज्याचा प्रमुख होतो. त्यावेळी गणपती विसर्जनाचा दिवस होता. गणपती विसर्जनाला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याला लवकर झोपा येत नाहीत. त्याचं कारण म्हणजे गणपतीच्या मिरवणूका कधी निघतील आणि कधी विसर्जीत होतील हे सांगता येत नाही. शेवटच्या दिवशी अधिक दक्ष राहावे लागते. त्यादिवशी मी लक्ष ठेवून होतो. शेवटचा गणपती परभणीचा होता. तो विसर्जीत झाल्याचे समजल्यावर पहाटे मी 3.30 ते 4 वाजता झोपयला गेलो. त्यानंतर अर्धा तासात घराच्या खिडक्या हालायला लागल्या. भूकंप असल्याचे जणवले. ताबडतोब कोयनेला फोन केला. कारण तिथं भूकंपप्रवण क्षेत्र आहे. त्याने सांगितले हा भूकंप कोयनेला नाही लातूरला आहे.

Delhi YashoBhoomi Photo : भारत मंडपम नंतर आता यशोभूमी तयार, उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

ते पुढं म्हणाले की मी सकाळी 7 वाजता विमान तयार ठेवयला सांगितले होते आणि आठ वाजता किल्लारीला पोहचलो होतो. 100 पेक्षा जास्त गावात भूकंपचा परिणाम झाला होता. हजारोंनी घरं पडली होती. संपूर्ण जीवन उध्दस्त झाले होते. त्या संकटातून पुन्हा उभा राहण्यासाठी इंजिनियर क्षेत्रातील अनेक मित्र होते. त्यांना संघटित केले आणि संपूर्ण किल्लारीचे चित्र पालटले. लोक आता विसरले पण किल्लारीच्या लोकांनी मला पुढच्या आठवड्यात आम्ही कसे सावरले आहोत हे बघायला बोलवले आहे. संकटातून सावण्याची ताकत अनेकांत असते पण त्यामध्ये अभियंता हा घटक देखील महत्वाचा असतो, असे शरद पवार यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube