‘सत्ताधाऱ्यांना चाहूल लागल्यानं फाईली पटाटप बाहेर काढतायत’; संत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर पटोलेंचं वक्तव्य

Untitled Design   2023 03 18T102219.878

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर चालू असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाली. मात्र, या प्रकरणावरील निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्ट कधीही या प्रकरणावरील सुनावणीचा निकाल देऊ शकतं. त्यामुळं ठाकरे गटासह शिंदे गटालाही चिंता लागली आहे. हा निकाल काय लागेल, हे सध्या तरी सांगण अवघड आहे. मात्र, याच दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक मोठं वक्तव्य केलं. मंत्रालयात हालचाली वाढल्या. सत्ताधाऱ्यांना चाहूल लागल्यानं फाईली पटाटप बाहेर काढत आहेत, असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे.

जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंडाळी केली होती. त्यामुळं ठाकरे सरकार कोसळलं होते. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केलं. राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आला, घटनाबाह्य सरकार असल्याचे आरोप झाले. राज्यात अनेक अभूतपूर्व घडामोडी घडल्या. त्यानंतर सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला दिलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या 9 महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. दरम्यान, सत्तासंघर्षाबाबत याचिका दाखल झाल्यानंतरतब्बल नऊ महिन्यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सध्याचं सरकार असंवैधानिक असल्याचं सांगितलं होतं. आता या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

सिनेसृष्टीवर शोककळा! मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

दरम्यान, आता नाना पटोले यांनी यावरूनही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मंत्रालयात हालचाली वाढल्या. सत्ताधाऱ्यांना चाहूल लागल्यानं फाईली पटाटप बाहेर काढत आहेत. सरकार जात असतांना ज्या प्रकारे मंत्रालयात हालचाली सुरू असतात. अगदी तशाच हालचाली संध्या मंत्रालयात पाहायमा मिळत आहे, असा दावा पटोले यांनी केला. त्यामुळं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जाणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube