‘…तर शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढणार’; भाजप नेत्याने वाढवलं शिंदेंचं टेन्शन

‘…तर शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढणार’; भाजप नेत्याने वाढवलं शिंदेंचं टेन्शन

Dwaram Mallikarjuna Reddy : काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मिठाचा खडा पडला होता. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल, अशी भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतली होती. हा वाद शांत होत नाही, तोच आता रामटेकच्या विधानसभेच्या जागेवरूनही भाजप आणि शिंदे गटात वाद उभा राहिला. रामटेकची विधानसभेची जागा यावेळी शिंदे गटाला गेली तर आपण विरोधात लढणार, असा थेट इशारा भाजपचे माजी आमदार द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी (Dwaram Mallikarjuna Reddy) यांनी दिला. (Former BJP MLA Dwaram Mallikarjuna Reddy warns Shinde group)

2019 मध्ये भाजप-शिवसेना युती झाली तेव्हा रामटेकची जागा भाजपला सुटली होती. आपण भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र, आशिष जयस्वाल यांनी खनीकर्म महामंडळाचे अध्यक्ष असतानाही आपल्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यामुळे रामटेकची जागा यावेली शिंदे गटाला गेली तर आपण विरोधात लढणार, असा थेट इशारा भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी दिला.

सीतारामन यांचे बराक ओबामांना प्रत्युत्तर, ‘तुम्ही 6 मुस्लिम देशांवर बॉम्ब फेकले’ 

रेड्डी म्हणाले, 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळी मी भाजपकडून लढलो आणि आमदार झालो. 2019 मध्ये युती झाली. युतीत ही जागा भाजपला मिळाली होती. आपण भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र, आशिष जयस्वाल यांनी खनीकर्म महामंडळाचे अध्यक्ष असतानाही आपल्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यामुळे भाजपचा पराभव झाला. निवडून आल्यानंतर जयस्वाल यांनी महाविकास आघाडीला अडीच वर्षे साथ दिली. शेवटी मंत्रिपद न मिळाल्याने ते शिंदे गटाकडे वळले. आता ही जागा शिंदे गटाला देऊ नये, असे रामटेकच्या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी भाजपाच कार्यकर्ता कमळ चिन्हावर लढावा. ही जागा शिंदे गटाला दिल्यास आम्ही त्याविरोधात लढू. भाजपच्या विरोधात लढणाऱ्याला परतफेड करावी लागेल, त्याचा हिशेब करावाचा लागेल, असा इशाराही रेड्डी यांनी दिला.

भाजपच्या बैठकींना येऊ नये

जयस्वाल यांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढतात. मग आमदारकीसाठी आम्ही कशी मदत करू, असा सवाल भाजप कार्यकर्ते करत आहेत. जयस्वाल यांनी सरकारी बैठकांना उपस्थित राहणं समजू शकतो, पण त्यांना भाजप पक्ष संघटनेच्या बैठकांना उपस्थित राहण्याचा अधिकार नाही, असं रेड्डी म्हणाले.

दरम्यान, मी १९९६ पासून गडकरींच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मी भाजपमध्येच आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचंही रेड्डी यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube