मराठी भाषिकांना न्याय अन् दुष्काळी जतला पाणी द्या; विश्वजीत कदमांचं सिद्धरामय्यांना साकडं
बेळगावच्या आमच्या मराठी भाषिकांना न्याय द्या, अन् दुष्काळी जत तालुक्याला पाणी देण्याचं साकडं कॉंग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना घातलं आहे. दरम्यान, सांगलीमध्ये आज काँग्रेसचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची उपस्थिती होती.
Maharashtrachi Hasyajatra फेम शिवाली परब करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? पोस्ट शेअर करत म्हणाली…
पुढे बोलताना विश्वजीत कदमांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सुरु असलेल्या संघर्षावर थेट भाष्य करीत आमच्या बेळगावातील मराठी भाषिकांना सांभाळा त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. यासोबतच सांगलीमधील दुष्काळी जत तालुक्याला पाणी द्या, कारण 2019 आणि 2022 साली महापुरामध्ये सांगलीकरांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. पूरावेळी अलमट्टी धरणातून पाणी सोडावं लागलं होतं, असं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.
Nitesh Rane : ‘हिच ती वेळ.. काय ते उद्या बोलू..’ नितेश राणेंच्या ‘त्या’ ट्विटचा रोख कुणाकडे?
यावेळी बोलताना कदम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोलही केला आहे. ज्या लोकांनी लोकशाहीच्या मुल्यांवर विश्वास ठेवत सत्ताधाऱ्यांना केंद्रात सत्ता दिलीयं, त्यांनी लोकशाहीची मूल्ये बाजूला सारुन हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल केली असल्याचं कदम म्हणाले आहेत.
Nana Patole : नागपूर, भंडाऱ्यानंतर आता सोलापूरातही झळकले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
सध्या देशभरात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांवर अन्याय, महिलांवर अत्याचाराच्या घटना घडताहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांवर सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
सत्ताधाऱ्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्यानेच काही दिवसांपूर्वी लोकांना आशेचा किरण पाहायला मिळालाय, त्याचं उदाहरण म्हणजे कर्नाटक निवडणूकीत काँग्रेसने एकहाती सत्ता आणली. या निवडणूकीत काँग्रेस पक्षाने एका सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्वार विश्वास टाकला आहे. सिद्धरामय्या यांनी खडतर परिस्थितीतून राजकारणात प्रवेश करत आपला ठसा उमटविल्याचं कदम यांनी स्पष्ट केलंय.