‘खोटी ऑडिओ क्लिप करण्याएवढा मी क्रुर बाप नाही’ : Jitendra Awhad यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्यावर टीका केली आहे. स्वत:च्या मुलीविषयी व जावयाविषयी खोटी ऑडिओ क्लिप तयार करणं व त्यातून प्रसिद्धी घेणे एवढा मी क्रूर बाप नाही. आपल्या सहका-याला इतक्या वाईट नजरेने बघत जाऊ नका, असे म्हणत त्यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांची मुलगी व जावयाला जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ती ऑडिओ क्लिप ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची असल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. यानंतर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांना मारहाण केली होती. त्यानंतर आव्हाड व त्यांच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
स्वत:ची मुलगी आणि जावयाविषयी खोटा ऑडीओ तयार करणं आणि प्रसिद्धी घेणं, इतका मी क्रुर बाप नाही. प्रसिद्धीसाठी मी नाटक करेनं हे शक्य नाही. ह्याबाबत बोलताना आपण थोडी प्रगल्भता दाखवली असती तर मला खूप बरं वाटल असतं. आपल्या सहका-याला इतक्या वाईट नजरेने बघत जाऊ नका. @mieknathshinde
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 27, 2023
जितेंद्र आव्हाड यांनी आज पुन्हा त्यासंदर्भात ट्विट केले आहे. “स्वत:ची मुलगी आणि जावयाविषयी खोटा ऑडीओ तयार करणं आणि प्रसिद्धी घेणं, इतका मी क्रुर बाप नाही. प्रसिद्धीसाठी मी नाटक करेनं हे शक्य नाही. ह्याबाबत बोलताना आपण थोडी प्रगल्भता दाखवली असती तर मला खूप बरं वाटल असतं. आपल्या सहका-याला इतक्या वाईट नजरेने बघत जाऊ नका”, असे त्यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये आव्हाड यांच्या मुलीने ठाणे पोलिस आमची तक्रार देखील घेत नाही, असा आरोप केला होता. तसेच संबंधित व्यक्तीमुळे आमच्या जीवाला धोका असल्याचे देखील त्या म्हणाल्या होत्या.
(Shambhuraj Desai : व्हिपच उल्लंघन झाल्यास प्रतोद कारवाई करु शकतात)