इंदोरीकर महाराजांच्या सासू झाल्या सरपंच

  • Written By: Published:
Indorikar

अहमदनगरः कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार या थेट ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूक लढल्या. निवडून येत संगमनेर तालुक्याच्या निळवंडे गावच्या सरपंच झाल्या आहेत.

शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत सुशिला उत्तम पवार यांचा २२७ मतांनी पराभव केला. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात गटाने २७, विखे गटाने ९ तर सोपान राऊत यांच्या गटाने घुलेवाडीत सरपंचपद मिळविले. जोर्वे हे आमदार थोरात यांचे गाव. हे गाव शिर्डी विधानसभा मतदार संघात मोडते. त्यामुळे या गावात विखे गटाचा हस्तेक्षेप वाढला. यातच राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे महसूल मंत्री झाल्यानंतर या परिसरात विखे गटाची ताकद वाढली आहे.

विखे गटाने जोर्वे व तळेगावमध्ये थोरात गटाचे वर्चस्व मोडित काढत सत्ता मिळविली. तर घुलेवाडीतील माजी सरपंच सोपान राऊत यांची सून निर्मला राऊत यांनी थोरात गटाचे प्राबल्य मोडित काढत सरपंचपद मिळविले आहे. संगमनेर तालुक्यातील थोरात गटाच्या ताब्यातील या तीन ग्रामपंचायतीतील सत्ता गेलेल्या आहेत. तर थोरात गटाने विखे गटाच्या ताब्यातील निमगाव जाळी व उंबरी बाळापूर सारख्या ग्रामपंचायतीतील सत्ता खेचून आणली आहे.

Tags

follow us