अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती द्या; जय पवारांची CID अधिकाऱ्यांकडे मागणी

Jay Pawar ;दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत त्यांचे पुत्र जय पवार यांनी पुण्यात CID अधिकाऱ्यांची भेट घेतली.

Jay Pawar Meets CID Officials Over Ajit Pawar Plane Crash Case

Jay Pawar Meets CID Officials Over Ajit Pawar Plane Crash Case: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत त्यांचे पुत्र जय पवार यांनी पुण्यात CID अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणाच्या तपासाची माहिती जाणून घेतानाच या प्रकरणाच्या चौकशीला वेग देण्याची मागणी त्यांनी केली. अपघातामागील सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही जय पवार यांनी स्पष्ट केले.

पुनित बालन ग्रुप आणि डुकाटीची हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये ‘पीबीजी डुकाटी रेसिंग’ची एंट्री

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सध्या CID कडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी अधिकाऱ्यांशी सुमारे 5 ते 10 मिनिटे चर्चा केली. तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली आणि चौकशी पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागू शकतो, याबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच तपासातील प्रलंबित मुद्द्यांवरही त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.

तपासात दिरंगाई नको, जय पवारांची भूमिका

विमान अपघाताच्या तपासातील सर्व महत्त्वाच्या बाबींची सखोल चौकशी होऊन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा जय पवार यांनी व्यक्त केली. अपघाताबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तपासात कोणतीही दिरंगाई न करता संबंधित बाबींची गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

देवाभाऊंना नाकीनऊ आणण्याचं होतं पण, बिचुकलेंची गाडी शिक्षकांनी 19 मतांवरच अडकवली…

सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच

अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर येणे हे त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाशी संबंधित असल्याचे जय पवार यांनी म्हटले. तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘आमने सामने’ नाटकातून रोहन गुजर, केतकी पालव यांना का काढलं? निर्माते मंगेश कदम, लीना भागवत यांनी सांगितलं कारण

या भेटीदरम्यान आमदार विक्रम काकडे हेही उपस्थित होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा निकाल लागेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा थांबवणार नसल्याचा निर्धार जय पवार यांनी व्यक्त केला.

follow us