दादांनी निधी रोखला! भाजप अन् शिंदेंना सहनच करावं लागणार; जयंत पाटलांची बोचरी टीका

  • Written By: Published:
दादांनी निधी रोखला! भाजप अन् शिंदेंना सहनच करावं लागणार; जयंत पाटलांची बोचरी टीका

Jayant Patil : अजित पवार (Ajit Pawar) पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केला. आम्हाला विकास निधी मिळत नाही, मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी ८०० कोटींचा निधा मंजूर झाला, अशी त्यांनी तक्रार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली. दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.

आधी स्विगी आता झोमॅटोचा नंबर; 401 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस जारी 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी भापजच्या सदस्यांनी विकासनिधीवरून केलेल्या आऱोपाविषयी विचारले. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत. त्यांची भापज आणि शिंदे गटाच्या मान्यतेनेच मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली. त्यामुळं त्यांच्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, मतदारसंघाला मदत करण्याचं काम ते तर करतीलच. आता अजित पवारांना सहन करण्याशिवाय शिंदे गट आणि भाजपच्या हातात काही नाही. ते त्यांच्या लोकप्रतिनिधींना मदत करतीलच त्याचा त्रास या दोन्ही पक्षांना सहन करावाच लागेल, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, ‘राजघराण्यांचा..,’ 

२२ जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी भापजकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, याच मुद्द्यावरून भाजपवर टीकाही होते. याविषयी विचारले असता पाटील यांना सांगितले की, राम जन्माच्या वेळी अयोध्या नगरी सजवण्यात आली होती, आज त्यांची प्राण प्रतिष्ठा होत असताना सर्वांनी सकारात्मक राहण्यात काही अडचण नाही; सर्वांनी हा कार्यक्रम आनंदाने घ्यावा त्यात आडकाठी आणण्याचे कारण नाही.

राम मंदिराचे निमंत्रण नाही
भाजपने देशातील अनेक मान्यवरांना, राजकीय नेत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आमंत्रित केलं. तुम्हाला या सोहळ्याला आमंत्रित केलं का, असं विचारलं असता ते म्हणाले की, मला राम मंदिर न्यास कडून निमंत्रण आले नाही. मी नंतर कधीतरी निवांत राम लल्लांच्या दर्शनाला जाणार आहे,

एसटी बँकेच्या संचालकांना हटवलं हा स्वागतार्ह निर्णय
एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी आज पदावरून हटवलं. सौरभ पाटील यांची हकालपट्टी हा गुणरत्न सदावर्तेना मोठा धक्का मानला जात आहे. यावरही पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, एसटी बँक चा प्रश्न लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आम्ही विधानसभेत लावून धरला होताय ती आमची मागणी मान्य झाली असून सहकार मंत्री यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचं पाटील यांना सांगितलं.

आज प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना मविआकडे लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागांची मागणी केली. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सर्व विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका आहे. सत्तारूढ पक्षाला मदत होईल असे कृत्य कोणत्याही पक्षाकडून होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube