फौजदाराचा झाला हवालदार, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

फौजदाराचा झाला हवालदार, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

Jayant Patil On Devendra Fadanvis :  कर्नाटक विधानसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला पोहचला अनेक नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. काल परवा कर्नाटक निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असा केला. फडणवीसांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले कोण सांगतंय पहा ज्यांचा भाजपने फौजदाराचा हवालदार केला. अशा लोकांनी आमची कशाला माप काढावीत ज्याला स्वतःच स्थान टिकवता आलं नाही. स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी आमचं सरकार पाडलं. परंतु यांच्या लोकांनी यांना मुख्यमंत्री न करता दुसऱ्याला मुख्यमंत्री केले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले बेळगाव जिल्ह्यात एक नंबरला निवडून येणारी शीट म्हणजे उत्तम पाटील यांची. मी माझ्या निवडणुकीला पहिल्यांदा जेव्हा उभा राहिलो होतो तेव्हा पवार साहेब माझ्या प्रचारासाठी आले होते. तेव्हा ते मला म्हणाले की पहिलं बाळंतपण जरा अवघड असत. तसं उत्तम पाटलांचं हे पहिलं आहे. उत्तम पाटलांचं नेतृत्वला एकदा संधी देण्याची विनंती यावेळी जयंत पाटील यांनी बेळगावच्या मतदारांना केली.

या मतदार संघाने 10 वर्ष भाजपाला संधी दिली तसेच काका पाटील यांना देखील संधी देऊन झाली. परंतु यांच्याकडून मतदार संघातील सामान्य माणसांच्या गरजा देखील दूर झाल्या नाहीत. अगदी यांच्याकडून निपाणी करांच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटू शकला नाही. डोगरी भागातील पाण्याची समस्या यांना सोडवता आली नाही. म्हणून राष्ट्रवादीच्या रूपाने तसेच उत्तम पाटलांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी देण्याची गरज आहे. असे जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले.

40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच

एकदा जर उत्तम पाटील यांना संधी दिली तर या मतदार संघातील पंचवीस वर्षांचा प्रश्न मिटेल भाजपमध्ये गेलेले लोक देखील उत्तम पाटील यांचं काम करत आहेत. भाजप मधील बेळगाव जिल्ह्यातील अनेक बडे नेते राष्ट्रवादी काँगेसमध्ये आल्याचे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले.

सध्या यादेशामध्ये हुकूमशाही सुरु आहे. कोणी सरकारच्या विरोधात बोलत असेल तर त्याला ईडीचा धाक दाखून शांत केले जाते. असा आरोप यावेळी जयंत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर केला. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही. कर्नाटकमध्ये धर्म निरपेक्ष सरकार आणणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्तम पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी मतदारांना केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube