Jayant Patil ED Enquiry : भाजपची ऑफर नाकारल्यानेच जयंत पाटलांना लक्ष्य; सामनातून जोरदार टीका

Jayant Patil ED Enquiry : भाजपची ऑफर नाकारल्यानेच जयंत पाटलांना लक्ष्य; सामनातून जोरदार टीका

Jayant Patil refus to accept BJP offer, thats why Enquiry by ED, criticized in Daily Saamana Foreword : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने नोटीस पाठवली होती. IL&FS प्रकरणात ईडीकडून ही नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी त्यांची ईडीकडून तब्ब्ल नऊ तास चौकशी झाली. जयंत पाटील यांची चौकशी होणार असल्यामुळं राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले होते. ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान, आता ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनातून (Daily Saamana) या कारवाईवरून भाजप (BJP) आणि तपास यंत्रणावर (Central Investigation Agency) टीका करण्यात आली.

जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी नाकारली. त्यामुळेच त्यांना ईडीकडून बोलावलणं आल्याचं मोठा खळबळजनक गौप्यस्फोट सामना अग्रलेखात करण्यात आला.

विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असा टीका विरोधक करत असतात. अशातच जयंत पाटील यांची ईडीने चौकशी केली. यावरून सामनातून हल्लाबोल केला. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ांसारख्या वागत आहेत. IAL&FS कंपनीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ED ने जयंत पाटील यांची चौकशी केली. त्यांना ही माहिती लेखी मागता आली असती. पण एखाद्याला त्रास देताना सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. या कथित घोटाळ्यात सहभागी असलेले लोक भाजपशी संबंधित लोकही असू शकतात. मात्र त्यांना चौकशीसाठी बोलावले जात नाही, अशा शब्दात सामनातून टीका केली.

प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचे कार अपघातात निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा

सुखाची झोप लागली असेल

जयंत पाटील यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. ते दुपारी बारा वाजता ED कार्यालयात गेले व रात्री साधारण दहा वाजता बाहेर पडले. ते हसतमुख होते. ते घरी गेल्यावर सुखाने झोपले असावेत. स्वाभिमानी आणि निर्भय लोकांनाही सुखाची झोप लागते, हे जयंतरावांनी दाखवून दिले. हर्षवर्धन पाटील आणि संजय काका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनाही सुखाने झोप लागली. त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावरील ईडीचा बालंट टळलं, असा चिमटा सामनातून काढला.

ऑफर नाकारली अन्….

जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना तात्काळ ईडीचं बोलावणं आलं. पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये येण्याचा दबाव होता. याची राजकीय वर्तुळातही चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांनी ही ऑफर फेटाळताच त्यांना ईडीने समन्स बजावले. यात आश्चर्य वाटायचं कारणं नाही, कारण, ईडीने अनेक लोकांसोबत असेच केले असल्याचा दावाही या अग्रलेखात करण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube