शाब्बास मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधानांचाच कित्ता…; ४०० कोटींच्या बिनव्याजी कर्जावरून आव्हाडांचा टोला

शाब्बास मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधानांचाच कित्ता…; ४०० कोटींच्या बिनव्याजी कर्जावरून आव्हाडांचा टोला

Jintendra Awhad : राज्यात आतापर्यंत एकही गृहनिर्माण प्रकल्प न राबविलेल्या खासगी विकासकाला सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम महाराष्ट्र निवारा निधीतून देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंद (Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार जिंतेद्र आव्हाड (Jintendra Awhad) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली.

फडणवीसांचे आक्रमक भाषण; नेत्यांकडून कौतुकाची थाप, पदाधिकाऱ्यांचीही दाद 

 

जिंतेद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला. त्यात त्यांनी लिहिलं की, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपलं गुरू मानलं आहे. त्या गुरूंना आजच्या गुरूपौर्णिमेची दक्षिणा म्हणूनच की काय मुख्यमंत्रीसुद्धा पंतप्रधानांचाच कित्ता गिरवत आहेत, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

पुढं आव्हाड यांनी लिहिलं की, एअरपोर्ट चालवण्याचा कोणताही अनुभव नसतानाही पंतप्रधानांनी अदानींना त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी राज्यात विकासप्रकल्प राबवण्याचा एकही अनुभव नसलेल्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवाज योजनेच्या नावाखाली बिनव्याजी तब्बल ४०० कोटी रूपये मंजूर केले आहेत. गुरूसाठी यापेक्षा मोठी गुरूदक्षिणा काय असू शकते. शाब्बास मुख्यमंत्री साहेब! महाराष्ट्रातील माझ्या तमाम मायबाप जनतेला मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचं प्रचंड कौतुक असणार, यात मला तिळमात्रही शंका नाही, अशी उपरोधिक टीका आव्हाडांनी केली आहे.

फडणवीसांचे आक्रमक भाषण; नेत्यांकडून कौतुकाची थाप, पदाधिकाऱ्यांचीही दाद 

बिनव्याजी कर्ज कसं वितरीत होणार?
400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर म्हाडाने गृहनिर्माण विभागाला ही रक्कम एकरकमी ऐवजी टप्प्याटप्प्याने म्हणजे प्रतिटप्पा 50 कोटी अशी वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. सदर रक्कम प्रकल्पावर खर्च करण्यााबाबत सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र दिल्यानंतर पुढील टप्प्यातील निधीचे वाटप करावे, असेही सुचवले आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतला जाणार आहे.

दरम्यान, बिनव्याजी कर्ज दिल्याने आव्हाडांनी शाब्बास मुख्यमंत्री साहेब! महाराष्ट्रातील माझ्या तमाम मायबाप जनतेला मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचं प्रचंड कौतुक असणार, अशी उपरोधिक टीका केल्यानं त्यांच्या टीकेला आता मुख्यमंत्री शिंदे काय प्रत्युत्तर देणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube