कल्याण-डोंबिवलीत महापौर कोणाचा? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी दिले मोठे संकेत…
कल्याण डोंबिवलीत महायुतीचाच महापौर बसणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.
Mla Ravindra Chavan : राज्यात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी महायुतीचे घटक पक्ष आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा गड असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. सर्वाधिका जागा जिंकल्यानंतर आता शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीत नक्की काय होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
महापालिका निवडणुकीनंतर महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या युतीबाबत कल्याण-डोंबिवलीत वेगळंच चित्र दिसून येत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मात्र, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर बसणार असल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर महापौरपदाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.
पेन्शनधारकांना 2030 सालापर्यंत मिळत राहणार पैसे; नेमका काय आहे सरकारचा निर्णय?
पुढे बोलतान चव्हाण म्हणाले, कल्याण-डोंबिवलीचा परिणाम मुंबई महापालिकेवर होणार नाही. मनसे शिवसेनेच्या युतीबाबत मला काही कल्पना नाही. यासंदर्भात दोनचार दिवसानंतर बोलणार असल्याचंही रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. मात्र, सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे.
काळ भैरवनाथ देवस्थानामधील अन्नछत्रालयातील तेलासाठी नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून मदत
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना – 53, भाजप – 50, मनसे – 5, काँग्रेस – 2, ठाकरेसेना – 11, शरद पवार गट – 1 अशा जागा मिळालेल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांचाही शिवसेनेला पाठिंबा असल्याचा दावा मनसेकडून दावा करण्यात आला आहे. तसेच शरद पवार गटाच्या एका नगरसेवकाचाही शिवसेनेला पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपला सोडून शिवसेना कल्याण डोंबिवलीत महापौर बसवणार का? हे आता पुढील काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
