karjat Tree Cutting : ‘भीमाशंकर’वरुन रान पेटणार, राज ठाकरे-मनोज जरांगेंची तोफ धडाडणार

टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या साई डोंगरावर करण्यात आलेल्या वृक्षतोडीची पाहणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनोज जरांगे करणार आहेत.

Thackeray

Karjat Tree Cutting : सरकारच्या टोरंट टॉवर (Torant Tower) या जलविद्यूत प्रकल्पासाठी कर्जत ते भीमाशंकर भागातील डोंगरावरील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. 377 हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल 32 हजार 490 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही वृक्षतोड सुरु असून वृक्षतोडीवरुन नागरिकांमधून संतापाची लाट पसरत आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे कर्जतच्या साई डोंगरावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

अमित त्रिवेदी यांनी राधिका बन्सल यांच्या ‘मीठे में क्या है’ चित्रपटातील ‘इचक दाना बिचक दाना’ गाण्याद्वारे उत्सवाचा उत्साह द्विगुणित केला

सह्याद्रीच्या रक्षणासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. टोरंट टॉवरच्या जलविद्यूत प्रकल्पासाठी भीमाशंकर, कर्जत डोंगरावर आठवड्यापासून
झाडांची कत्तल सुरु आहे. ज्या ठिकाणी वृक्षतोड झालीयं, त्या साई डोंगरावर राज ठाकरे पाहणी करणार आहेत. त्यानंतर कर्जत पोलिस ग्राऊंडवर जाहीर सभा घेणार
वृक्षतोडीचा मुद्दा आणि आजची सभा या अनुषंगाने मनसेकडून टीझर प्रदर्शित करण्यात आला असून 377 हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पासाठी 32 हजार 490 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागगिरकांकडून मधून संताप व्यक्त होतोयं.

तर दुसरीकडे वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमधून संतापाची लाट उसळत असतानाच या प्रकरणात मनोज जरांगे यांनीही लक्ष घातलं असून ‘भीमाशंकर वाचवा’ मोहिमेला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला आहे. जरांगे आज दुपारच्या सुमारास कर्जतच्या साई डोंगरावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, चव्हाण-पाटील यांच्यात अटीतटीची लढत

दरम्यान, झाडांच्या कत्तलीवरुन सत्ताधारी सरकारवर विरोधकांसह नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमधून संतापाची लाट उसळताना दिसून येत आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीदेखील सरकारच्या या प्रकल्पाला विरोध दर्शवत झााडांच्या कत्तलीला कडाडून विरोध दर्शवला आहे. राज्यात झाडांच्या कत्तलीचं प्रकरण चांगलंच तापलेलं असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या जाहीर सभेतून कोणावर निशाणा साधणार? सभेत ते नक्की काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

follow us