Kasba By Poll Result : आनंद दवे, बिचुकलेंचा पत्ता साफ ?; दोघांपेक्षा मतदारांनी नोटाच दाबला

Kasba By Poll Result : आनंद दवे, बिचुकलेंचा पत्ता साफ ?; दोघांपेक्षा मतदारांनी नोटाच दाबला

kasba By Election : कसबा मतदासंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात अटीततटीची लढाई होत आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघातील हिंदू महासभेचे उमेदवार आनंद दवे (Anand Dave) आणि अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichkale) यांना मतदारांनी साफ नाकारले आहे.

वाचा : Kasba By Election : धंगेकरांचा रासनेंना दे धक्का.. तेराव्या फेरीत घेतली मोठी आघाडी

तेराव्या फेरीअखेर दवे यांना फक्त 123 मते मिळाली आहेत. तर बिचुकले यांनी दोन आकडी संख्याही अजून पार केलेली नाही. त्यांना फक्त 4 मते मिळाली आहेत. दोघांनाही कसब्यातील मतदारांनी नाकारले आहे. दुसरीकडे आता मतमोजणीच्या सोळा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या फेरीअखेर धंगेकरांनी जवळपास 6 हजार 957 मतांनी आघाडी घेतली आहे.

Kasba By Election : विधिमंडळ परिसरातही कसब्याचीच चर्चा, आमदार लावताहेत पैजा !

हिंदू महासभेच्या आनंद दवे यांच्यामुळे भाजपला नुकसान होईल अशीही चर्चा होती. मात्र त्यांना मिळालेली मते पाहता तसे घडलेले नाही. उमेदवारी अर्ज भरल्यापासून बिचुकले या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरले होते. प्रसारमाध्यमांनीही त्यांना महत्व दिले होते. तसे पाहिले तर कसबा बिचुकले यांचा मतदारसंघ नाही तरीदेखील त्यांनी ज्या पद्धतीने अर्ज दाखल केला त्याची चर्चा होती. बिग बॉस स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यांची चर्चा होती. प्रत्यक्षात निवडणुकीत त्यांना मतदारांनी साफ नाकारले आहे.

कसबा मतदारसंघात भाजपने पूर्ण ताकद लावली होती. मात्र, यंदा काँग्रेसने जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अजूनही आघाडीवर आहेत. आता मतमोजणीच्या फक्त चार फेऱ्या बाकी राहिल्या आहेत. धंगेकरांची समर्थकांनी तर विजयोत्सवाची तयारीही सुरू केली आहे. भाजपच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube