अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? आमदार निलंगेकरांच्या वक्तव्यानं खळबळ

Untitled Design (46)

लातूर : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. काँग्रेस नेते अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलंय. आमदार निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. आपला राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलंय. ते भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलत होते. या वक्तव्यानंतर लातूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आलंय.

निलंगेकर यांनी मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलंय. निलंगेकर यांच्या या वक्तव्यामुळं लातुरच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा कायम राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा निलंगेकर यांनी केलाय. पुढे बोलताना निलंगेकर यांनी म्हटलं की, जरी अमित देशमुख हे भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षा घेणार नाही. निलंगेकर यांच्या या वक्तव्यामुळं लातुरच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

लातुर जिल्ह्याच्या राजकारणात देशमुख घराण्याचं मोठं वर्चस्व आहे. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. लातुर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार लाभलाय. आता कॉंग्रेसचे नेते अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य निलंगेकर यांनी केलंय. अमित देशमुख खरंच कमळ हाती घेणार का? हे पाहावं लागणार आहे. तसं झाल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरेल.

Tags

follow us