live now
Vidhanparishad Live Blog : औरंगाबादमध्ये मविआचा ‘विक्रम’, नाशिकमध्ये ‘सत्यजीत’ आघाडीवर
Live Blog Legislative Council Counting :
विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल आतापर्यंत जवळपास स्पष्ट झाले आहेत. पाच जागांपैकी कोकणची जागा शेकापला धक्का देत भाजपने जिंकली आहे. पण नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवाराला मविआच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
औरंगाबादमध्ये आपला गढ राखण्यास महाविकास आघाडीला यश आले आहे. विक्रम काळे पुन्हा निवडून आले आहेत. नाशिक मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर असून अमरावतीमध्ये मात्र भाजपच्या रणजीत पाटील हे पिछाडीवर आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचा 'विक्रम', विक्रम काळे यांच्या गळ्यात चौथ्यांदा विजयाची माळ
औरंगाबादमधील अंतिम निकाल जाहीर झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली असून सकाळपासून मतमोजणीमध्ये तेच आघाडीवर होते.
विक्रम काळे यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. विक्रम काळे यांनी चौख्यांदा विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. विक्रम काळे यांच्या या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष केला जातोय.
अंतिम निकाल आला तेव्हा विक्रम काळे यांना 20 हजार 195 मतं मिळाली. तर भाजपचे किरण पाटील यांना 13 हजार 570 मतं मिळाली.
-
अजित पवार म्हणतात, "सत्यजीत तांबेच निवडून येणार!"
नाशिकमध्ये सत्यजित तांबेच निवडून येतील. निवडून आल्यावर भाजपसोबत जायचे की अन्य कोणासोबत, याबाबत तांबे स्वतः योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
-
नाशिकमध्ये मतमोजणीची तिसरी फेरी सुरु
नाशिकमध्ये मतमोजणीची तिसरी फेरी सुरु झाली आहे. मतमोजणीची तिसरी फेरी सुरु आतापर्यंत सत्यजित तांबे आघाडीवर आहेत
-
नाशिक पदवीधर मतदारसंघ; दुसऱ्या फेरीतील एकूण मतदान
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
सत्यजित सुधीर तांबे : 31009
शुभांगी भास्कर पाटील : 16316
रतन कचरु बनसोडे : 1157
सुरेश भिमराव पवार : 360
-
अमोल मिटकरी म्हणतात "दया कुछ तो गडबड है"
देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली ? "दया कुछ तो गडबड है"
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 2, 2023
-
"गडकरी, फडणवीस यांचे अभिनंदन" अमोल मिटकरी यांची खोचक टीका
नागपुरात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यानंतर आमदार अमोल मिटकरी तो धागा पकडून भाजपवर खोचक टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, "नागपूर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यांचें व दुसरीकडे नागपूरचे वैभव रेशीमबागसंघ कार्यालय, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन"
नागपूर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यांचें व दुसरीकडे नागपूरचे वैभव रेशीमबागसंघ कार्यालय, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 2, 2023
-
सत्यजीत तांबेचा निर्णय हायकमांड घेणार
सत्यजीत तांबे निवडून आले तर त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडायचे की नाही, यावर हायकमांड निर्णय घेईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच वक्तव्य
-
फडणवीस, गडकरींना धक्का, महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी
महाविकास आघाडीचे नागपूरचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे.
नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले हे सुरवातीपासून विजयाच्या दिशेने घोडदौड करत होते. आडबोले यांना 16 हजार 500 मते पडली आहेत. ते 10 हजार 134 मतांनी जिंकले आहेत.
तर भाजपच्या ना. गो. गाणार यांना 6 हजार 366 हजार मते मिळाली आहेत. गाणार यांचा मोठ्या संख्येने पराभव झाला आहे.
-
नाशिक पदवीधर मध्ये सत्यजीत तांबे ८,२६६ मतांनी आघाडीवर
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीची पहिल्या फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीनंतर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे ८,२६६ मतांनी आघाडीवर असून तांबे यांना १५, ७७४ तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना ७,७०८ मते
-
नागपूरमध्ये 22 पैकी 19 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
नागपूर मधील विधानपरिषद निवडणुकीच चित्र आता स्पष्ट झालं आहे. नागपुरात 22 पैकी 19 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. फक्त 3 उमेदवारांना 3408 पेक्षा जास्त मते असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयाच्या वाटेवर आहेत.