वय फक्त आकडा! शरद पवारांनी मैदान गाजवलं; घेतल्या 69 जाहीर सभा अन् 3 पत्रकार परिषदा

वय फक्त आकडा! शरद पवारांनी मैदान गाजवलं; घेतल्या 69 जाहीर सभा अन् 3 पत्रकार परिषदा

Sharad Pawar 69 Sabha And 3 Press Conference : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानासाठी काही अवघे तास शिल्लक आहेत. मागील 15 दिवस प्रचार सुरू होता. सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या सभा थंडावल्या आहेत. बारामती मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी देखील चर्चेचा विषय आहे. अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांनी सांगता सभा घेवून काल बारामतीत प्रचार मोहिमांचा शेवट केलाय.

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली. प्रचारादरम्यान त्यांनी स्वत:ला केंद्रस्थानी ठेवलं. महाविकास आघाडीतील नेत्यांपैकी सर्वात जास्त सभा शरद पवार यांनी घेतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार 1 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान सुरू होता. या कालावधीत शरद पवार यांनी 69 जाहीर सभा आणि 3 पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. आता या सभांचा शरद पवार गटाला किती फायदा होईल, हे येणारी तारीखच सांगणार आहे.

महायुती की महाविकास आघाडी?, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?, फलोदी सट्टा बाजारचा थेट दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी, ‘मी महाराष्ट्रात फिरुन पुन्हा पक्ष बांधेन’, असं वक्तव्य केलेलं होतं. हे विधान शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात उतरुन दाखवलं आहे. शरद पवार यांचं वय 69 आहे. परंतु विधासभा निवडणुकीत वय फक्त आकडा हे वाक्य शरद पवारांकडून पाहून खरं झाल्याचं दिसतंय. त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीत प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला होता. 84 वर्षांचे शरद पवार यांनी राज्यभरामध्ये फिरुन राजकीय वातावरण ढवळून काढलं. ‘गद्दारांना साधसुधं नाही, तर जोरात पाडा, महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे’, असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

राज्यात 15 दिवस प्रचाराचा झंझावत, कोणत्या नेत्याने किती सभा घेतल्या? वाचा सविस्तर

शरद पवार यांनी घेतलेल्या सभा राज्यातील अन्य नेत्यांच्या तुलनेत चर्चेचा विषय ठरतोय. शरद पवार यांनी दिवाळीमध्ये 1 नोव्हेंबर रोजी प्रचार मोहीमेचा शुभारंभ केला होता. या मोहीमेची 18 नोव्हेंबर रोजी सांगता झाली. या काळात शरद पवार यांनी 69 जाहीर सभा आणि 3 पत्रकार परिषदा घेतल्या. दरम्यान काल प्रतिभा पवार यांनी हातात घेतलेल्या एका फलकाची चर्चा होतेय. “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय” असा आशय त्यावर लिहिलेला होता.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube