Rahul Narvekar : लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्याने खळबळ
Rahul Narvekar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन एक महिना उलटून गेला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना निर्णय घेण्यासाठी अजूनही वेळ मिळालेले नाही. मात्र, त्यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषविलेले दिवंगत बाळासाहेब देसाई यांची चरित्रग्रंथ दौलत याचा बुधवारी प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यातच नार्वेकर यांनी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकताच समोर बसलेल्या मंत्री गिरीश महाजनांनी तर डोक्यालाच हात लावला. त्यांच्या या कृतीचीही चांगलीच चर्चा होत आहे.
Jitendra Awhad ‘….तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसा महाराष्ट्र पेटेल’ : आव्हाडांचा गंभीर इशारा
ते पुढे म्हणाले, 1977 ते 78 दरम्यान विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. 77 मध्ये माझा जन्म झाला त्यावेळी बाळासाहेब देसाई यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यांनी आपल्य आयुष्यात ज्या प्रमाणे क्रांतीकारी निर्णय घेतले त्यातूनच शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईल.
त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाल्याचे लक्षात येताच नार्वेकरांनी लागलीच चिंता करण्याची काही गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितलेलं नाही, असे म्हणत बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी मेरिटवर निर्णय असे म्हटले. त्यालाही दुजोरा देत मेरिटवर निर्णय घेईन असे नार्वेकरांनी सांगितले.
दरम्यान, आमदारांच्या अपत्रातेबाबत नार्वेकर यांनाच निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य त्याच अनुषंगाने आहे का अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.