तू कोण सांगणारा मला मी काय बोलायचं; पडळकर अन् मिटकरींमध्ये सभागृहातच जुंपली

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 24T113915.077

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी काल विधानपरिषदेमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात तु-तु, मै- मै झाल्याची पहायला मिळाली. यावेळी दोघांनी सभागृहामध्येच एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोघांना समज देऊन शांत बसायला सांगितले.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे काल विधानपरिषेदत बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. काही लोकांनी अनेक वर्ष पुण्याचं नेतृत्व केलं. पण विकासाच्या कल्पना मांडल्या नाहीत. मुंबई-पुणे हायवे बांधायचे काम देखील भाजप- शिवसेना युतीच्या सरकारने केले आहे. फक्त पुण्याला लुटायचं आणि बारामतीला न्यायचं असे म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

सुजय विखेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, आम्ही डाकू आहोत का ?

यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले. अमोल मिटकरी यांनी पडळकरांना माफी शब्द मागे घ्यायला लावले.  यानंतर मी कुणाचेही नाव घेतले नाही, असे पडळकर म्हणाले आहेत. यावर गोपीचंद पडळकर व अमोल मिटकरी या दोघांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. तु मला सांगू नको, खाली बसायचे असे पडळकर म्हणाले आहेत. तसेच विकास करायचा नाही फक्त सत्ता उपभोगायची व भाजपवर टीका करायची असे म्हणत पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

“…तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन” उदयनराजेंनी का दिलं चॅलेंज? वाचा

दरम्यान, याआधी देखील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात अनेकवेळा खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले आहे. या दोन्ही नेत्यांनी अनेकवेळा एकमेकांवर एकेरी भाषेत टीका केली आहे. कालच्या त्यांच्या वादानंतर विधानपरिषेदच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोघांना आपापल्या जागेवर बसायला लावले.

Tags

follow us