सुजय विखेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, आम्ही डाकू आहोत का ?

सुजय विखेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, आम्ही डाकू आहोत का ?

Sujay Vikhe : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घणाघाती भाषण केले. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या या भाषणाचे पडसाद राजकीय वर्तुळात अजूनही उमटत आहेत. याच मुद्द्यावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आगपाखड केली आहे.

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे शेतकरी मेळावा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

वाचा : Nashik Election भाजप नवीन ट्विस्ट आणणार? सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य

विखे म्हणाले, की ‘राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे तो भाजपने दिलेला नाही. मात्र, आता विरोधकांची अशी परिस्थिती झाली आहे त्यांचा न्यायालयावर विश्वास नाही, पोलिसांवर विश्वास नाही, महसूलवर देखील विश्वास नाही आणि परमेश्वरावरही विश्वास नाही.’ ‘ते मागचे तीन वर्ष जे परमेश्वर म्हणून राहत होते त्यांचा आता भ्रमनिरास झाल्याने ते असे वागत आहेत. जनता येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधींवर बोलण्यात माझ्याकडे वेळ नाही.’

राज ठाकरे हे भाजपाची स्क्रिप्ट वाचत आहेत अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यावर बोलताना सुजय विखे म्हणाले, की ‘गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी देखील राज ठाकरे हे त्यांचे भूमिका परखडपणे मांडत होते. ज्यावेळी ते त्यांच्या बाजूने बोलत होते त्यावेळेला राज ठाकरे त्यांना चांगले वाटत होते आता ते त्यांच्या विरोधात परिस्थिती मांडतात तर त्याचं दुखणं त्यांना होत आहे.’

नामांतरावर एकत्रित निर्णय घ्यावा; सुजय विखे

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांचे भाषण सर्वांना दाखवलं आणि त्याद्वारे त्यांची भावना शरद पवार, अशोक चव्हाण यांच्या बद्दल काय होती हेही सांगितले. जर उद्धव ठाकरे त्यांची भूमिका बदलत असतील तर ते संत आणि आम्ही डाकू का ?,’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

वाळू तस्करीचा उतमात सरकारने मोडला

वाळू तस्करीमुळे राज्यात सुरू असलेला उतमात या सरकारमुळे मोडीत निघाला आहे, यापुढे राज्यात कोणीही खाजगी व्यक्ती वाळू विकू शकत नाही. सरकार स्वतः सरकारी डेपोतून वाळू ग्राहकांपर्यंत पोहोच करेल. सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू नागरिकांना दिली जाईल. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले या गंभीर प्रश्नाकडे कोणीही लक्ष दिलं नव्हतं आठ हजार रुपये ब्रास वाळू आता नागरिकांना 1000 रुपयांमध्येच मिळणार आहे. शिवाय घरकुल योजनेसाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे हा निश्चितच ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे मोठ्या शहरात घरांच्या किमती 40 टक्क्यांनी स्वस्त होतील असेही सुजय विखे म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube