अजितदादांबरोबर तुमचे वाद आहेत का? जयंत पाटलांनी अखेर खरं सांगितलंच

अजितदादांबरोबर तुमचे वाद आहेत का? जयंत पाटलांनी अखेर खरं सांगितलंच

Jayant Patil : राष्ट्रवादीत बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले. ज्यावेळी राष्ट्रवादीत बंडखोरी झाली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार (Ajit Patil) यांच्यात वाद असल्याचीही चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्यातील वादाचा प्रश्न कधीतरी समोर येतोच. आताही पत्रकारांनी पाटील यांना हाच प्रश्न विचारला.

पाटील यांनी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुमच्यात आणि अजित पवार यांच्यात वाद आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर आमच्यात कधीच वाद नव्हते तुम्हाला ते कुठे दिसले का, उगाच कुठलाही मुलामा देऊ नका. अजित पवार आणि मी आमच्यात कधीही वाद नव्हते. आम्ही शरद पवार यांचे कार्यकर्ते आहोत त्यांच्याबरोबर राहिलो आहोत. इतकंच आहे.

…तर माझे डोळे सुंदर हवे; गावितांच्या विधानावर नितेश राणेंची टोलेबाजी!

राज्यात शरद पवार यांच्या सभा होत आहेत. या सभांना मोठी गर्दीही होत आहे. असे असताना काही लोक या सभांबाबत गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. बीड येथील सभा ही संदीप क्षीरसागर यांनी आयोजित केली होती. ते ओबीसी नेते आहेत. त्या ठिकाणी जी भाषणं झाली त्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवार यांची येवला येथे सभा झाली. त्यावेळी कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांनी दसरा चौकात सभा घ्यावी असा आग्रह धरला. त्यामुळे आता 25 ऑगस्टला येथे सभा होणार आहे, असे पाटील म्हणाले.

सोडून गेले त्यांच्याबद्दल काय बोलणार?

शरद पवार यांना जे सोडून गेले, ते सगळे त्यांना मानतात. तेच आमचे नेते आहेत, तेच आमचे विठ्ठल आहेत. आता असे नेते जेव्हा सोडून जातात तेव्हा काय बोलणार, पण या सगळ्या नेत्यांना राजकारणात पुढे आणण्याचं काम शरद पवार यांनीच केलं असे पाटील यांनी ठणकावून सांगितले. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसता तर आमच्यातील कुणीही मंत्रीपदापर्यंत पोहोचलं नसतं, असेही पाटील यांनी सांगितले. 

मंत्री गावितांच्या विधानाचं भाजप नेत्याने केलं समर्थन! म्हणाल्या, चुकीचा अर्थ काढून…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube