सुप्रिया सुळेंनी केले शिंदेंच्या शिवसेनेचे कौतुक; म्हणाल्या, कमी मार्कात पास होणारा…
Supriya Sule : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात (Shivsena Advertisement) सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवरून आज दिवसभरात सत्ताधारी विरोधकांत प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
सुळे म्हणाल्या, आज पेपर वाचून मनापासून आनंद वाटला. महाविकास आघाडीचे सुगीचे दिवस आले हे जे सत्तेत आहेत त्यांनीच कबूल केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करते की चलो आता रयतेचं राज्य 2024 मध्ये येतंय. आपण पूर्ण ताकदीने कामाला तर लागले आहोतच. कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आणि आता जे सरकार आहे त्या सरकारचं अपयश आज वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावरच्या जाहिरातीत दिसतंय. माणसानं किती खरं असावं याबद्दल मी शिवसेनेचं कौतुक करते की स्वतः कमी मार्कात पास झालाय एवढं कबूल करणारा हा पहिलाच पक्ष असेल.
कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा एकनाथ शिंदेंचा पहिलाच पक्ष – खा. सुप्रियाताई सुळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज सर्व प्रमुख वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मिश्कील टिप्पणी… pic.twitter.com/arhCOPdPE7
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 13, 2023
दरम्यान, या जाहिरातींवर आज राज्याच्या राजकारणात दिवसभर प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी शिंदे आणि फडणवीसांची चांगलीच कोंडी केली आहे. भाजपातील नेतेही या प्रकाराने नाराज झाले आहेत. आमदार प्रविण दरेकर यांनी तर ही जाहिरात टाळता आली असती असे म्हटले आहे. ही जाहिरात देण्यामागे कोण आहे, हेतू काय आहे हेही समोर येईल असे दरेकर म्हणाले.
शिंदेंकडून भाजप मोडकळीस आणण्याचा प्रयत्न – राऊत
एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना हे दाखवून दिले आहे की तुमच्या घरात येऊन सुद्धा मी तुमचं घर कसं उद्धवस्त करू शकतो. शिवसेना उद्धवस्त केली, उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. आता भाजप सुद्धा मोडकळीस आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. हा जो झालेला सर्व्हे आहे तो कोणत्या एजन्सीने केला. कोणता अधिकृतपणा त्या सर्व्हेला आहे हे अजूनही समोर आलेले नाही. केवळ आपले कौतुक करून घेण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
‘शिवसेना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आता भाजपलाही’.. राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप