‘शिवसेना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आता भाजपलाही’.. राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप
Vinayak Raut criticized Eknath Shinde : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवरून आज दिवसभरात सत्ताधारी विरोधकांत प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे.
खासदार राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना हे दाखवून दिले आहे की तुमच्या घरात येऊन सुद्धा मी तुमचं घर कसं उद्धवस्त करू शकतो. शिवसेना उद्धवस्त केली, उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. आता भाजप सुद्धा मोडकळीस आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. हा जो झालेला सर्व्हे आहे तो कोणत्या एजन्सीने केला. कोणता अधिकृतपणा त्या सर्व्हेला आहे हे अजूनही समोर आलेले नाही. केवळ आपले कौतुक करून घेण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
Shivsena Advertisement : भल्या मोठ्या जाहिरातीवर CM शिंदेंचं थोडक्यात उत्तर
भारतीय जनता पार्टीच्या मदतीने ज्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्याच भाजपला खाली ढकलायचं आणि पंतप्रधानांच्या आशिर्वादाने राज्यात आपले वर्चस्व निर्माण करायचे हा त्यांचा (एकनाथ शिंदे) दुटप्पीपणा जाहिरातीच्या माध्यमातून सिद्ध झाला आहे. पण एक गोष्ट नक्की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी लोकप्रियता महाराष्ट्रात होती त्यांचे रेकॉर्ड कुणी मोडू शकत नाही.
हा मॅनिप्युलेट केलेला सर्व्हे आहे. याआधी जसे धर्मवीर चित्रपट काढून स्वतःची छबी उंचावण्याचा प्रयत्न केला तोच प्रयत्न या सर्व्हेच्या माध्यमातून केला आहे. या सर्व्हेला अधिकृत कोणताही दुजोरा नाही, असे राऊत म्हणाले.
राणे या, पराभूत व्हा आणि संन्यास घ्या
नारायण राणेंनी यावं पुन्हा एकदा पराभव घ्यावा आणि राजकीय संन्यास स्वीकारावा अशी कोकणवासियांची मनोकामना आहे, असे स्पष्ट करत विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आव्हान दिले.
सीएम शिंदेंकडून फडणवीसांना बगल; जाहिरातबाजीवर दरेकर आक्रमक
विकासकामे सुद्धा रद्द केली
खासदार गजानन किर्तीकर यांनी जे मत व्यक्त केल आहे. ते खरं आहे. हे दहा मंत्री सोडले तरी बाकीच्यांच्या मनात खदखद आहे. केवळ त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखवायचे आणि आपल्याजवळ ठेवायचे हा प्रकार आता सर्व आमदारांना कळून चुकला आहे. 50 खोके आणि 100 कोटींची विकासकामे देण्याचे जे जाहीर केले होते त्या 50 खोक्यांपैकी काही खोके दिले पण, विकासकामांच्या बाबत सगळ्यांचीच नाराजी आहे. किंबहुना काहींची विकासकामे रद्द केली आहेत.