फडणवीसांच्या इशाऱ्यावर भाजप मंत्र्यांचा कारभार; अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

24_10_2019 Ajit Pawar_19696689

Ajit Pawar : विधिमंडळात आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. भाजप (BJP) मंत्र्याकडे काही काम घेऊन गेले तर ते म्हणतात आधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटा. कारखान्यांच्या कामानिमित्त सहकारमंत्री अतुल सावे (Atul Sawe) यांना भेटतो पण काही उपयोग होत नाही. ते आधी म्हणतात फडणवीस यांना भेटा हे योग्य नाही, अजून किती दिवस फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार काम करणार, असा सवाल पवार यांनी केला.

ठाण्यात गुंडांना सरकारचं अभय; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना ललकारलं

अजित पवार पुढे म्हणाले, देवेंद्रजी तुमचे विखेंवर भरपूर प्रेम दिसते. तुम्ही त्यांच्या दोन कारखान्यांना मदत केली. हर्षवर्धन पाटील यांच्या दोन कारखान्यांनाही मदत केली. आता आमच्या राष्ट्रवादीच्या सहा ते सात आजारी कारखान्यांनाही मदत करा.

शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन नाना पटोलेंनी सरकारला घेरलं…

कारखान्यांच्या कामांसाठी सहकारी मंत्री अतुल सावे यांना भेटून काहीच उपयोग होत नाही. कारण, त्यांना भेटलो तर ते म्हणतात की आधी फडणवीसांना भेटा. ही बाब मंत्री म्हणून योग्य नाही. किती दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार काम करणार, असा उपरोधिक सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे राज्यातील अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम झाला आहे. या मुद्द्यावर अजित पवार यांनी सरकारला घेरले. ते म्हणाले, की अत्यावश्यक सेवांवर होत असलेला परिणाम पाहता या आंदोलनावर तत्काळ मार्ग काढणे गरजेचे आहे. यासाठी सरकार आणि कर्मचारी  संघटनांनी एकत्रित बसून यावर तत्काळ तोडगा काढावा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube