विधानपरिषदेत गनिमी कावा; पालकमंत्रिपद अडवून ठेवलं; शिवसेनचा आमदार तटकरेंवर पुन्हा बरसला
Mahendra Dalvi -निवडणूक झाली असती तर असे चित्र राहिले नसते. वरिष्ठांच्या आदेशामुळे मी मुलीचा अर्ज माघारी घेत युती धर्म पाळला आहे.
Mahendra Dalvi on Sunil Tatkare: रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष आहे. परंतु विधानपरिषद निवडणुकीत हा संघर्ष टळल्याचे दिसून आले. कारण कोकण विधानपरिषद मतदारसंघात तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून गेले आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी तटकरेंबाबत मवाळ भूमिका घेतल्याची राजकीय चर्चा होती. परंतु शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एका सुनील तटकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. तटकरे यांनी गनिमा कावा करत विधानपरिषदेवर मुलगा निवडून आणला आहे. पण पालकमंत्रिपद अडवून ठेवलं असल्याचा आरोप दळवी यांनी केलाय.
Iran-Israel Conflict : हल्ला करणार नाही पण लेबनॉनला टार्गेट केलं तर प्रत्युत्तर ; इराणने दिला इशारा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या कोकणातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये कमालीची रस्सीखेच झाली होती. शेवटी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. या जागेवर सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत हे बिनविरोध निवडून आले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतली होती. तर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली हिने माघार घेतली होती. कोकण विधानपरिषद निवडणुकीत दीडशे कोटी रुपयांची घोडेबाजार झाला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला समर्थन करणारे विधानही महेंद्र दळवी यांनी केले आहे. ते म्हणाले, कोकणसारख्या ठिकाणी निवडणूक होणे काळाची गरज होती. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक झाली आहे. एेवढी मोठी निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे संशयाला वाव मिळत आहे. सहा सीट बिनविरोध आहे. अकरा ठिकाणी निवडणूक झाली आहे. निवडणूक झाली असती तर असे चित्र राहिले नसते. वरिष्ठांच्या आदेशामुळे मी मुलीचा अर्ज माघारी घेत युती धर्म पाळला आहे.
सोन खरेदीदारांसाठी मोठी बातमी! दर 5 हजार 500 रुपयांनी घसरले, तुमच्या शहरात काय भाव?
सुनेत्रा पवारांनाही ते विसरले
खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी काही शब्द दिले आहेत. परंतु राजकीय उलटफेर करणारे लोक आहेत. सुनील तटकरे म्हणतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्र्यांचा प्रश्न सोडविणार आहे. पण तटकरे हे स्वतःच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विसरले आहेत, असा टोलाही दळवी यांनी लगावला आहे.
महेंद्र थोरवेंनाही टोला
आमदार महेंद्र थोरवे हे तटकरे यांचे विरोधक आहे. परंतु आता त्यांनीच गिअर बदलला आहे. लोकांना मान्य नाही ते नेत्यांनी करू नये. तटकरेंविरोधात मी पाय रोवून उभा आहे. महायुतीचा आमदार असलो तरी मी विरोधात आहे. भरतशेठ गोगावले यांनी पालकमंत्रिपदाचा शब्द घेतला आहे, असे महेंद्र दळवी म्हणाले.
काम झालं तर ते कुणाला विचारत नाही. पानं पुसण्याचे काम ते करतात, अशी टीकाही दळवी यांनी तटकरे यांच्यावर केली.