दसरा आणि दिवाळीत शरद पवारांच्या गटात धमाके: अनेक नेत्यांची शिंदे, अजितदादा अन् फडणवीसांसोबत चर्चा

  • Written By: Published:
दसरा आणि दिवाळीत शरद पवारांच्या गटात धमाके: अनेक नेत्यांची शिंदे, अजितदादा अन् फडणवीसांसोबत चर्चा

Shambhuraj Desai On Sharad Pawar Grpup : काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करून शिंदे-फडणवीसांशी हात मिळवणी केली. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होत नऊ मंत्रिपदे आपल्या गटाच्या पदरात पाडून घेतली. त्यांच्या बंडामुळं राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यानंतर त्यांनी थेट पक्षावरच दावा ठोकला आहे. अशातच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठं विधान केलं. यंदा दसरा आणि दिवाळीत मोठे धमाके होणार आहे, असं विधान त्यांनी केलं.

Rohit Pawar : मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील, रोहित पवारांचा टोला 

आज माध्यमांशी बोलतांना देसाईंनी सांगितलं की, राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील काही नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा सुरू आहे. शरद पवार गटातील अनेक नेते हे महायुतीत येण्यास उत्सुक आहेत. ते लवकरच अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत, त्यामुळं यंदा दसरा आणि दिवाळीत मोठे धमाके होणार आहे. दिवाळी-दसऱ्यात नेहमीच मोठे धमाके होतात. यावेळीही मोठा धमका होणार, हे निश्चित आहे. त्यामुळंचं कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे, असं देसाईंनी म्हणाले.

एखादा मोठा नेता किंवा आमदारांचा गट जर महायुतीला समर्थन देण्यासाठी सरकारमध्ये येत असाल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असंही देसाईंनी म्हटलं आहे. देसाई यांनी यावेळी शरद पवारांच्या गटातील कोणते नेते अजित पवारांच्या गळाला लागले आहेत? हे सांगितले नाही. पण, त्यांच्या या विधानामुळं पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं शिंदे गट आणि भाजपमधील अनेक आमदारांची नाराजी झाली होती. कारण अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे मिळाली. तर ठाकरे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. दरम्यान, आता पुन्हा मंत्रिमंडळाची विस्ताराची चर्चा सुरू झाली. तीनही पक्षातील आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळं विस्तारात कुणाला संधी मिळणार याविषयी राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.

दरम्यान, शंभुराजे देसाईंनी दिवाळी-दसऱ्याला भूकंप होणार असं विधान केलं. शरद पवार गटातील अनेकजण अजित पवार गटात येणार असं विधान केलं. त्यामुळं शरद पवारांची साथ सोडणारे हे नेते कोण असू शकतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube