तू काय सरकारचा बाप झालास काय? मनोज जरांगेंनी भुजबळांची अक्कलच काढली…
तू काय सरकारचा बाप झालास काय? या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांची थेट अक्कलच काढलीयं.

Manoj Jarange On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर आता ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जीआरविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या जीआरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनीही भुजबळांबाबत भाष्य करीत थेट एकेरी उल्लेख केलायं. तू काय सरकारचा बाप झालास काय? तूलाच लय अक्कल अन् बाकीच्यांना अक्कल नाही, लय शहाणा समजतो का? या शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचा चांगलाच समाचार घेतलायं.
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! राज्यात ‘या’ योजनेस थेट दोन वर्षांची मुदतवाढ; फायदाच फायदा..
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले, छगन भुजबळ काय सरकारचा बाप लागून गेला काय, ज्याअर्थी लोकं जीआरविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र,कोर्टातजात आहेत याचा अर्थ हा जीआर मराठ्यांसाठी महत्वाचा असून पोरांचं भविष्य जीआरवर अवलंबून आहे. भुजबळने 8 पानाचं पत्र देऊ द्या नाहीतर 800 पानांचं, त्याला कोलून लावणार आहेत. तो काही सरकारचा बाप नाही, त्याचंच ऐकायला त्याला काय करायचं करु द्या, सरकारने हेराफेरी करायची नाहीतर रस्त्यावर फिरु देणार नाही
हा जीआर कॅबिनेटने काढलायं, तूला लय अक्कल अन् बाकीच्यांना अक्कल अक्कल नाही तू लय शहाणा लागून गेला काय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कमी अन् तूला जास्त अक्कल आहे काय, दीड पुस्तक वाचले तर तु शहाणा झाला काय? या शब्दांत जरांगेंनी भुजबळांना सुनावलंय.
Pune Gangwar : हातात पत्र, डोळ्यात पाणी… गणेश कोमकरने लेकाचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला
तसेच तू राष्ट्रपती घटनासमितीत आहे का? तू सगळ्या दुनियेचा बेअक्कल, सरकारचा अन् ओबीसी मराठ्यांचा नास करु ठेवला, तू म्हणशील तशे कायदे बनवायचे का? म्हणजे तू सरकारचा बाप व्हायला लागला काय, फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे नास करणारा हा सरकार बदनाम करेल, एकटा वेठीस धरायला लागला सरकारला म्हणजे हा सरकारचा मालक झाला काय? सरकारने याचं ऐकून आमच्या जीआरमध्ये अजितबात हेराफेरु करु नये, नाहीतर पुढचा काळ आता विदारक परिस्थिती असल्याचं जरांगेंनी म्हंटलंय.
दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या हैदराबाद गॅझेटबद्दलही मोर्चाचा दावा आहे की, तो फक्त कुणबी म्हणून नोंद असलेल्या लोकांना फायदा करतो; मराठा म्हणून नोंद असलेल्या समाजाला त्याचा लाभ मिळणार नाही. मोर्चाचे म्हणणे आहे की, मराठा म्हणून ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवण्यासाठी लढाई तेच लढतील. दरम्यान, या भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलन आता दोन गटांत विभागले गेले आहे. समाजातील विविध मागण्यांमुळे सरकारसमोर हा प्रकरण अधिक संवेदनशील आणि तोडगा काढण्यास आव्हानात्मक बनले आहे.