Sharad Pawar यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक, ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा

Sharad Pawar यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक, ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडणार आहे. सायंकाळी सहा वाजता ही बैठक पार पडणार असून देशातील कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. देशात 2024 ला लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभुमीवर ही बैठक असल्याचं बोलंलं जात आहे.

या बैठकीला प्रामुख्याने तृणमुल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, के. चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहे. या बैठकीमध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने देशातील विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मात्र या बैठकीला कॉंग्रेस उपस्थित राहणार का ? यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण कॉंग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधण्यासाठी शक्य नसल्याचा पवित्रा कॉंग्रेसने घेतला.

Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…

या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने देशातील निवडणुका निष्पक्ष होण्यासाठाी ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. कारण देशातील अनेक निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये गैरव्यवहार करत असल्याचा आरोप विरोधक भाजपवर करत असतात. त्याचंबरोबर या बैठकीचा मुख्य विषय हा 2024 ला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असणार आहेत. विरोधकांची रणनिती काय असणार यावर देखील चर्चा होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube