‘नांदेडच्या मृत्यू तांडवाला अशोक चव्हाणच जबाबदार’; मुश्रीफांनी चव्हाणांवर दिलं लोटून

‘नांदेडच्या मृत्यू तांडवाला अशोक चव्हाणच जबाबदार’; मुश्रीफांनी चव्हाणांवर दिलं लोटून

Hasan Musrif Vs Ashok Chavan : नांदेडच्या मृत्यू तांडवाला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर लोटून दिलं असल्याची जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, नांदेडच्या मृत्यू तांडवानंतर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योरापाचे सत्र सुरु असतानाच आता हसन मुश्रीफ यांनी अशोक चव्हाणांनाच जबाबदार धरलं आहे.

Vishal Pinjani: दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या ‘मिस्टर गे वर्ल्ड 2023’ साठी करणार भारताचे प्रतिनिधित्व

हसन मुश्रीफ म्हणाले, अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील आमदार आहेत. ते याआधी माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. या घटनेआधीपासूनच अशोक चव्हाण यांची रुग्णालयाला महिन्यातून एकदा दोनदा भेट देणं ही त्यांची जबाबदारी होती. मात्र, त्यांनी तसं केलं असतं आज ही वेळ आली नसल्याची टीकाही मुश्रीफ यांनी यावेळी केली आहे.

जनतेच्या पैशातून परदेश दौरा, उबाठाच्या आरोपावर सामंतांनी मांडला हिशोब; म्हणाले, ‘दौऱ्यात सगळा खर्च…’

नांदेड घटनेमध्ये 12 लहान मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या रुग्णांना आधी खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर संबंधित डॉक्टर सुट्टीवर असल्याने रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत आजच सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचा अहवाल ते देणार असल्याचं मुश्रीफांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही शासनाची जबाबदारी झटकत नाही, पण अशा गोष्टी यापुढे होऊ नयेत, यासाठी प्रामाणिकपणे लक्ष देणार असल्याचेही मुश्रीफ म्हणाले आहेत.

नांदेड, संभाजीनगर घटनेनंतर सरकारला आली जाग; औषधे खरेदी करण्याचे दिले अधिकार

नांदेडमध्ये सोमवारी एकाच दिवसात 24 जणांना जीव गमवावा लागला. तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नांदेडच्या दुर्देवी घटनेनंतर छ. संभाजीनगरमधील घाटी शासकीय रुग्णालयात दोन अर्भकांसह 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात ठाण्यातील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र यातून सरकारने कोणताही धडा घेतला नसल्याची टीका विरोधकांनी केली.

अशोक चव्हाण म्हणाले :
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात २४ जणांना जीव गमवावा लागला. रुग्णालयात अपुऱ्या सोयीसुविधा, डॉक्टरची कमतरता, नर्सेच्या बदल्या झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.रुग्णालयाची परिस्थिती चिंताजनक असून अनेक नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत, डॉक्टरांची कमतरता असल्याने शासनाने इथल्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube