नांदेड, संभाजीनगर घटनेनंतर सरकारला आली जाग; औषधे खरेदी करण्याचे दिले अधिकार
नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूंचं तांडव पाहायला मिळालं होतं. यामध्ये अनेक नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेनंतर राज्यभरातून संतापाची भावना व्यक्त होत असतानाच आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर 100 टक्के औषधं खरेदी कण्याचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
Devendra Fadnavis : अजितदादा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, आमच्या शुभेच्छा पण…
नांदेड संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये गेल्या-तीन दिवसात 60 पेक्षा अधिक मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृत्यूच्या घटनेला औषध तुटवडा करमीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.या प्रकारावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं होतं.
Ajit Pawar : आपण चुकलोय हे अजितदादांना समजलं; ठाकरेंच्या आमदारानं सांगितलं कारण
हे खूनी सरकार असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वेडटीवार यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर औषध तुटवडा लक्षात घेता राज्य सरकारने स्थानिक पातळीवर १०० टक्के औषध खरैदी करण्याचा अधिकार बहाल केला आहे. जिल्हा नियोजना समितीमधून ही खरेदी करावी असा शासन आदेश राज्यसरकार ने काढला आहे.
अहमदनगरचे पालकमंत्रीपद विखेंकडे ‘सेफ’ : सुनील तटकरेंनी सांगितले कारण
वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत येणारे मेडिकल कॉलेज आणि जिल्हा पातळीवरील जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यासाठी लागणारी औषध खरेदी जिल्हा नियोजन विभागातून डीपीडीसीमधून निधी उपलभ्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आहे. या निधीतून शंभर टक्के औषध खरेदी करावी, असे देखील शासन निर्णयात म्हटलं आहे.
दरम्यान, या औषध खरेदीमुळे डीपीडीसीवर कुठलाही अतिरिक्त ताण येणार नाही. उलट डीपीडीसीचा नियतव्यय (निधी) हा वाढवून देण्यात येईल. त्यामुळे तत्काळ औषध खरेदी करता येईल. सामन्यात: खरेदीचा विषय मंत्रालय स्तरावर येऊन त्याला वेळ लागण्याचा अनुभव पाहता डीपीडीसीमुळे तात्काळ निधी उपलब्ध झाल्याने औषध खरेदीचा मार्ग सुलभ होणार असल्याचं माजी अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.
Devendra Fadnavis : अजितदादा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, आमच्या शुभेच्छा पण…
नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातूनही अशीच धक्कादायक बातमी समोर आली. येथील घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 बालकांचा समावेश होता. या घटनेने एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनही हादरून गेले आहे. या रुग्णालयात काहीच दिवस पुरेल इतका औषधसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आलं होतं.