जनतेच्या पैशातून परदेश दौरा, उबाठाच्या आरोपावर सामंतांनी मांडला हिशोब; म्हणाले, ‘दौऱ्यात सगळा खर्च…’

जनतेच्या पैशातून परदेश दौरा, उबाठाच्या आरोपावर सामंतांनी मांडला हिशोब; म्हणाले, ‘दौऱ्यात सगळा खर्च…’

Uday Samant on Aditya Thackeray : मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सातत्याने मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या परदेशवाऱ्यांवर टीका करत आहेत. नुकतंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या परदेश दौऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे. त्यांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर जनतेच्या पैशातून परदेश दौऱ्यावर जाण्याचा आरोप केला आहे. यावर आता उदय सामंत यांनी लंडन दौऱ्याच्या खर्चाचा लेखाजोखा मांडत आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच, चंद्रशेखर बावनकुळेंचा चिमटा 

उदय सामंत यांनी ट्विट करत लिहिलं की, माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च कोणी केला? त्याचं उत्तर सोबत देत आहे. 27 सप्टेंबर 23 रोजी ट्रॅव्हल कंपनीला दिलेला चेक आणि त्याची पोच पावती सुध्दा आहे. संपूर्ण दौऱ्यात राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च देखील मी स्वत: केलेला आहे. पण मी विचारलेल्या 2022 च्या दावोस दौर्‍याच्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. पण, असो आता मी ते विचारणार नाही. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा संबंधितांनी त्याची उत्तरं द्यावी. माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असं सामंत म्हणाले.

त्यांनी पुढं लिहिलं की, महाराष्ट्र 2019 नंतर उद्योग जगतात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे आणि भविष्यात महाराष्ट्राचा प्रथक क्रमांक टिकवण्यासाठी महायुती सरकार कसोशीन प्रयत्न करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, असं ट्वीट सामंत यांनी केलं.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांचा हा जर्मनी आणि ब्रिटनचा दौरा रद्द झाला. यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. आम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळंच एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परदेशवाऱ्या रद्द झाल्या, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

यावेळी त्यांनी उदय सामंत यांच्यावर जनतेच्या पैशातून परदेश दौऱ्यावर जाण्याचा आरोप केला आहे. आमचा कुठेही वैयक्तिक वाद नाही. परंतु, जनतेच्या पैशावर यांनी सहलीला जाऊ नये, असं ते म्हणाले होते. तसंच सातत्याने मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या सुरू असलेल्या परदेशवाऱ्यांवर टीका केली. याला आता उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube