Mission 150 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी BJPचा मेगा प्लॅन तयार

  • Written By: Published:
Mission 150 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी BJPचा मेगा प्लॅन तयार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या (Mumbai Municipal Elections) तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी, आतापासूनच राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपनं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मिशन 150 (Mission 150) ची घोषणा केली आहे. हा संकल्प सत्यात उतरवण्यासाठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेची पोलखोल करणार असल्याची रणनिती भाजपने आखली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पण त्याचवेळी भाजपने आगामी मुंबई महापालिकांसाठीही ‘मिशन १५०’ ची तयारी सुरु केली आहे. पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपची कार्यकारणी बैठक पार पडली. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणी बैठक झाली.

या बैठकीत विनोद तावडे (राष्ट्रीय सरचिटणीस, भाजपा), चंद्रशेखर बावनकुळे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजपा), पूनम महाजन, आशिष शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सूचना दिल्या. या बैठकीला भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजने मिशन 150 चा नारा दिला आहे. यासाठी मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पोलखोल करणार असल्याची रणनिती भाजपने आखली आहे. तर ठाकरे गटही त्यांचा ‘सामना’ करण्यास सज्ज झाला आहे. महापालिका निवडणुकांसाठी भाजपने मुंबईतील खासदार आणि आमदारांकडे ‘मिशन १५०’ ची विशेष जबाबदारी दिली आहे. दररोज पंधराशे लोकांपर्यंत पोहचण्याचे भाजपने लक्ष्य ठेवले आहे.

काउ हग डे’वरून ममता बॅनर्जींचा केंद्रातील सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या, “जर गायीने धडक दिली तर…”

कोविड काळातील भ्रष्टाचार, पालिकेतला सत्ताधाऱ्यांचा कारभार भाजप चव्हाट्यावर आणणार आहे. या सोबत ज्या विभागात भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद नाही, त्याठिकाणी पक्ष संघटन आणखी मजबूत आणि विविध कार्यक्रम राबवण्यासाठी या बैठकीत निर्णय झाले. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करण्याचा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता ठाकरे गट भाजपच्या या रणनीतीची सामना कसा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube