राज्याच्या अर्थसंकल्पात नुसता घोषणांचा सुळसुळाट, मात्र पैसा कोठून आणणार?

Untitled Design   2023 03 30T191011.200

सातारा : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. यातच आमदार शशिकांत शिंदे (MLA shashikant shinde) यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. नुकताच साडे सहा लाख कोटींचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये योजनांच्या घोषणांचा सुळसुळाट होता. पण, त्याला पैसा कोठुन उभा करणार हा प्रश्न आहे. अशा शब्दात आमदार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित जनता दरबारानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते.यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राज्याच्या अर्थसंकल्पावरून शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, राज्याचा साडे सहा लाख कोटींचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात योजनांच्या घोषणांचा सुळसुळाट झाला मात्र या घोषणांसाठी पैसा कोठुन उभा करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच यातील बहुतांशी योजना केंद्राच्या असून त्यांच्याकडून पैसे कधी येतील त्यावर या योजनांचे भवितव्य अवलंबून असणार असल्याचा शाब्दिक टोला शिंदे यांनी लगावला आहे.

मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास होणार; मुख्यमंत्र्यानी दिले आश्वासन

पुढं बोलताना शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यातील पहिला टप्पा दिला आणि त्यांनतर राज्यातील सरकार गेलं. पण, आताच्या सरकारच्या काळात दुसरा, तिसरा टप्प्यातील शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत. पैशाचे कसलेही नियोजन नाही. आता नुसतीच 1200 कोटींची तरतूद केलेली आहे. मात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

अजित पवारांना कोर्टाची भाषाच समजत नाही…फडणवीसांचा टोला

राहुल गांधी प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल
शिंदे म्हणाले, ज्या मोदींनी राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला त्यांनीच हा दावा मागे घेण्याचे सुतोवाच केले होते. तेवढ्यात काहीतरी गडबड होते तोच दावा पुढे लगेच सुरु केला जातो आणि एका महिन्यात निर्णय होतो. एका दिवसात राहुल गांधी यांचे खासदारकीचे पद रद्द होते. हा लोकशाहीचा नवा पायंडा आपल्याला पहायला मिळतो. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स व्यतिरिक्त सुद्धा आता अपात्र करण्याचे हत्यार भाजपला यामाध्यमातून मिळाले आहे अशी टीका त्यांनी केली.

Tags

follow us