आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात

आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात

रायगड : माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पोलादपूर जवळ कशेडी घाटात हा अपघात झाला. रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तर सुदैवाने या अपघातामध्ये आमदार योगेश कदम हे किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप बचावले आहेत.

यावेळी या गाडीमध्ये आमदार योगेश कदम यांच्यासह त्यांचे वाहनचालक आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रूगण्लायात उपचार सुरू आहेत. या अपघाताबद्दल मिळालेली माहिती अशी की, आमदार योगेश कदम हे मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारला पोलादपूरजवळ एका धरधाव वेगात असलेल्या डंपरने धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.

या अगोदरच भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला होता. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार झाल्या नंतर त्यांनी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या अगोदरच भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील अपघात झाला होता. तर आता दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात लोकप्रतिनिधींचेच असे अपघात होत असतील तर सामन्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube