भुट्टोचा पुतळा जाळताना खासदार प्रताप चिखलीकर जखमी
नांदेड : नांदेडमध्ये भाजपकडून पाकिस्तान आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळण्यात आला. तर पुतळा जाळताना भडका उडाल्याने खासदार प्रताप चिखलीकर यांचा हात भाजला आहे. यावेळी जवळ असलेल्या कार्यकर्त्याने प्रसंगावधान दाखवत तात्काळ आग विझवली. यामध्ये चिखलीकरांचा हात किरकोळ भाजला.
गेल्या काही दिवसांपुर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. भुट्टो म्हणाले होते की, ओसामा बिन लादेन मारला गेला. पण गुजरातचा कसाई जिवंत आहे. यावरून भारतानेही सडेतोड प्रतिउत्तर दिले होते. संयुक्त राष्ट्रात बिलावल यांना प्रतिउत्तर देताना म्हटल की, पाकिस्तानकडे भारतावर आक्षेप घ्यायला कारण नाहियेत आणि पाकिस्तानात निर्माण होत असलेल्या दहशत वादाला थांबवावे लागणार आहे.
भारताने पाकिस्तानला प्रतिउत्तर देताना म्हटल की, ओसामा बिन लादेनचा हुतात्मा झाल्यासारखा गौरव करणारा आणि झकीउर रहमान लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश पाकिस्तान आहे.