…तर ‘दुध का दूध , पानी का पानी’ होणारच; संजय जाधवांचं ठाकरेंच्या राहुल पाटलांना आव्हान
MP Sanjay Jadhav यांनी ठाकरेंचे आमदार राहुल पाटलांच्या टीकेला उत्तर दिले. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पाटील यांना आताच आव्हान दिले आहे.
MP Sanjay Jadhav Challenge to Thackrey’s MLA Rahul Patil for Loksabha : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान ठाकरेंचे परभणीचे बंडखोर खासदर संजय जाधव हे विधानभवनात आले होते. त्यावेळी लेट्सअप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या वक्तव्यांबाबत भूमिका स्पष्ट केली. तर त्याचबरोबर परभणीचे ठाकरेंचे आमदार राहुल पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. तसेच त्यांनी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पाटील यांना आताच आव्हान दिले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय जाधव?
उद्धव ठाकरे नेते आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण संजय राऊत यांच्यापेक्षा मी लहान आहे. त्यांनी या भाषेत बोलू नये. त्यांनी त्यांचं पद आणि उंची बघून बोलावं. तर राहुल पाटलांवर बोलताना जाधव म्हणाले की, ते निष्ठावंत आहेत. ज्यांनी प्रत्येक निवडणूकीत निष्ठा विकली. ही एक चेष्टाच आहे. मी 2022 लाच शिंदेंकडे गेलो असतो. पण तेव्हा पक्षाशी बांधिलकी ठेवून काम करण्याचा विचार ठेवला. पण त्यांनी ताकद दिली नाही. तसेच राहुल पाटलांच्या वागण्यावरून त्यांना कोणतीही समज दिली नाही. इकडे पाटलांनी आपल्या नातेवाईकांनाच संधी दिली. या सर्वाला कंटाळले होतो. एकत्र असूनही विरोधच असेल तर विरोधातच का जाऊ नये.
ठाकरे परिवारावर नाराजी नाही. त्यांना सोडल्याचं वाईट वाटतयं. मात्र आता सामाजिक राजकारण आता करून चालत नाही. राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. लोकांना विकास हवा आहे. आता राजकारणात अर्थकारण आलं आहे. म्हणून मी शिंदेंसोबत गेलो आहे. तसेच यावेळी जाधवांना राहुल पाटलांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘दुध का दूध , पानी का पानी’ होणारच त्याची काय चिंता करायची. असं म्हणत संजय जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पाटील यांना आताच आव्हान दिले आहे.