MPSC विद्यार्थ्यांची शरद पवारांनी घेतली फिरकी

MPSC विद्यार्थ्यांची शरद पवारांनी घेतली फिरकी

मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी येऊन भेट देऊन आमच्या व्यथा जाणून घेतल्या, याबद्दल आपले आभार मान्यासाठी आम्ही आज तुम्हाला भेटीला आलो आहोत, असं परीक्षार्थींनी पवार यांना यावेळी सांगितलं.

शरद पवारांनीही मुलांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्याकडून भविष्याचा ‘मार्ग’ जाणून घेतला. गेल्या काही महिन्यापासून आपल्या मागण्यांकरिता आंदोलनाला बसलेल्या MPSC परीक्षार्थींच्या लढ्याला यश आलंय. एमपीएससी मुख्य परीक्षात नवा पॅटर्न २०२५ पासूनच लागू होणार आहे, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिला आहे. परीक्षार्थींना पाठिंबा देण्यासाठी २ दिवसांपासून आंदोलन करत होते. त्या आंदोलना ज्येष्ठ नेते शरद पवार रात्री ११ वाजता पुण्यातील आंदोलनस्थळी आले होते. त्यांच्या या व्यथा-वेदना जाणून घेतल्या.

आंदोलनस्थळावरुन शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन या प्रकरणी तातडीने लक्ष घालावी, अशी सूचना शरद पवार यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एमपीएससी आयोगाला पत्र लिहिलं. यानंतर एमपीएससीने ट्विट करुन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला.

काल फडणवीस, आज एकनाथ शिंदे यांचा कसब्यात पॉवर शो

यावर “आपण रात्री ११ वाजता आम्हाला भेटलात. या वयातही आपण तब्बल ४० मिनिटे तसेच उभा होता. आमच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलात. इतर पुढारी पुण्यातील कसब्यात प्रचाराला आले अन् तिथून आमच्याकडे आले. आपण एकमेव असे होता की, ज्यांनी फक्त आमच्यासाठी वेळ दिलात. आपले खरोखर आभार…”, अशा भावना परीक्षार्थींनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

यावर पवारांनी मिश्किल शैलीत विद्यार्थ्यांची फिरकी घेतली. “माझी तुम्हा सगळ्यांकडे एक तक्रार आहे. या वयातही देखील… असं आपण पुन्हा पुन्हा म्हणता…. आपण मला काय म्हतारा समजता का…?” असं पवार म्हणताच विद्यार्थ्यांमध्ये हसू पिकलं यावरून शरद पवारांना देखील हसू अनावर झालं.

Kasba By Election : कसब्यातील मतदार हिंदुत्ववादी : फडणवीस यांनी केली मांडणी

शरद पवारांनी प्रत्येक विद्यार्थ्याला नाव- गाव विचारत पुण्यात कधीपासून अभ्यास करत आहात ? आई वडील काय करततेत ? असे काही सवाल विचारले आहेत. यावरून नंतर भविष्यातील त्यांचे ‘मार्ग’ विचारताना अधिकारी व्हायचंय हे ठीक आहे.. पण स्वत:चं काही निर्माण करावसं का वाटलं नाही ? किंवा वाटत नाही का? असे काही सवाल शरद पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना विचारला. यावर विद्यार्थी निरुत्तर झाले. काही सेकंद हॉलमध्ये शांतता पसरली. या सर्व विद्यार्थ्यांकडे उत्तर नसल्याचं बघून शरद पवार इतर प्रश्नांकडे वळले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube