मुंबई महाराष्ट्राचीच…कोणाच्या बापाची नाही, देवेंद्र फडणवीसांकडून कर्नाटक सरकारचा निषेध

मुंबई महाराष्ट्राचीच…कोणाच्या बापाची नाही, देवेंद्र फडणवीसांकडून कर्नाटक सरकारचा निषेध

नागपूर : मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, कोणाच्या बापाची नाही, मुंबईवर अधिकार सांगितल्यास खपवून घेतलं जाणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सभागृहात ठणकावून सांगितलयं.

दरम्यान, कर्नाटकच्या काही मंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा, अशी मागणी केली. यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील मंत्र्यांचा चांगला समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत दोनही राज्यांचे मंत्री कोणताही दावा करणार नसल्याचं ठरलं होतं, मात्र कर्नाटकच्या मंत्र्यांकडून महाराष्ट्राविरोधात दावे केले जात आहेत. कर्नाटक मंत्र्यांचे दावे गृहमंत्र्यांच्या बैठकीनूसार पूर्णपणे विसंगत असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच कर्नाटकच्या दाव्यांचा आम्ही निषेध करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. यासंदर्भात आम्ही गृहमंत्र्यांसह कर्नाटक सरकारला पत्र पाठवणार असल्याचं ते म्हणालेत.

दरम्यान, कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांनी केलेले दावे राज्याच्या समुपदेशानासाठी बरोबर नसून गृहमंत्री अमित शाहा यांनी अशा बोलघेडवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, अशी मागणी देखील केलीय.

तसेच मुंबई महाराष्ट्राचीच नाही कोणाच्या बापाची…असंही ते म्हणालेत. यासंदर्भात सभागृह म्हणून आम्ही निषेध करत असून हा निषेध कर्नाटक सरकारसह केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहचवणार असल्याचं सांगितलयं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube