नागपुरात भाजपला धक्का बसणार? अभिजित वंजारी 7 हजार मतांनी पुढे, नितेश कराळेंचीही घोडदौड सुरु

Nagpur Graduate Constituency Election Result: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मानकापूर येथील क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू आहे.

Nagpur Graduate Constituency Election Result

Nagpur Graduate Constituency Election Result: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मानकापूर येथील क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या मतांच्या प्राथमिक आकडेवारीनुसार काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी (Abhijeet Vanjari) यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांच्यावर आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. वंजारी यांना 37 हजार, तर कोहळे यांना 30 हजार मते मिळाल्याचे सांगितले जात आहे. अपक्ष उमेदवार नितेश कराळे (Nitesh Karale) यांनाही 10 हजार मते मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद मतमोजणीत मोठे उलटफेर होणार?, पहिल्या कलांमुळं राजकीय वर्तुळात खळबळ

मानकापूरच्या क्रीडा संकुलात 84 टेबलवर मतमोजणी सुरू असून, एकूण 84 हजार मतांची मोजणी केली जात आहे. दुपारी अडीच वाजता ही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात काही टेबलवर भाजपचे सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यापेक्षा 15 मतांची आघाडी घेतल्याचे सांगण्यात आले. तर काही ठिकाणी वंजारी 10 मतांनी पुढे असल्याची माहिती मतमोजणी प्रतिनिधींनी दिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

भाजपच्या सर्व्हेत कराळे मास्तरांना 15 हजार मतांचा अंदाज? मतदानाआधी ढसाढसा रडले अन्…

दरम्यान, अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना मिळणाऱ्या मतांमुळेही निकालाची उत्सुकता वाढली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये त्यांची कामगिरी कशी राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मतमोजणी अद्याप सुरू असल्याने अंतिम निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स; बंटी पाटलांनी महायुतीसमोर पदर का पसरविला ?

निवडणुकीसाठी आलेल्या 238 टपाली मतपत्रिकांची प्राथमिक छाननी पूर्ण झाली आहे. त्यापैकी 34 मतपत्रिका अवैध ठरल्या, तर 204 मतपत्रिका वैध असल्याची माहिती देण्यात आली. वैध टपाली मतपत्रिकांच्या मोजणीत अभिजित वंजारी यांना 101, सुधाकर कोहळे यांना 86, तर इतर उमेदवारांना 22 मते मिळाल्याचे सांगितले जात आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, चव्हाण-पाटील यांच्यात अटीतटीची लढत

टपाली मतपत्रिकांमध्येही वंजारी यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र, नियमित मतमोजणी सुरू असल्याने आणि अंतिम आकडेवारी जाहीर झालेली नसल्याने निकालाचे स्पष्ट चित्र समोर येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us