घेतले खोके, भूखंड ओके; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

  • Written By: Published:
घेतले खोके, भूखंड ओके; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

नागपूरः भूखंडाच्या आरोपावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले आहे. आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घेतले खोके, भूखंड ओके अशी नवी घोषणाही यावेळी देण्यात आली.

गेल्या तीन दिवसांपासून भूखंडावरून मुख्यमंत्र्यांवर महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला आहे. सभागृहाच्या बाहेरही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना घेरण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाबाहेर विरोधकांकडून मुख्यमंत्री, राज्यपाल, सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव… महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो… मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अश्या घोषणा देण्यात आल्या.
विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube