Nana Patole : ओबीसी आरक्षण ते मीरा बोरवणकर प्रकरण; पटोलेंनी शिंदे फडणवीस अन् अजित पवांरांना चौफेर घेरले

Nana Patole : ओबीसी आरक्षण ते मीरा बोरवणकर प्रकरण; पटोलेंनी शिंदे फडणवीस अन् अजित पवांरांना चौफेर घेरले

Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, दुष्काळ, बोरवणकर, कंत्राटी भरती. अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

यावेळी नाना पटोले ओबीसी आरक्षणावर बोलताना म्हणाले की, मला असे वाटते की, मीडियामध्ये कॅन्फ्युजन निर्माण करतात का. सरकारने घेतलेल्या निर्णय विरोधात विरोधी पक्षनेते बैठक घेत असतात. आमच्या टीमचा आढावा आम्ही घेत आहोत. भाजपाविरोधात आमची रणनीती आहे. तर भाजपमध्ये भविष्य़ात मोठं बंड होणार आहे. असं म्हणत त्यांनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचे दमदार पुनरागमन; श्रीलंकेला 209 धावांत गुंडाळले

राज्यात दुष्काळ नाही असे सरकारचे मत आहे. दुष्काळ जाहीर केला नाही. कॅबिनेट बैठकीत काहीच निर्णय होत नाही. एक मंत्री वाघनखं आणायला विदेशात गेले आणि सरकारच्या पैशांची उधळपट्टी केली. तर मीरा बोरवणकरांच्या पुस्तकावर बोलताना पटोले म्हणाले की, त्यांनी दादा म्हटले आहे. दादा कोण. IPS अधिकारी यांच्यामुळे या सरकारमध्ये उद्रेक झाला आहे.

वडेट्टीवार अन् पटोलेंचे पुन्हा दक्षिण-उत्तर! ओबीसी प्रश्नावरुन दोघांच्या दोन स्वतंत्र बैठका

आम्हाला ही भरती मान्य नाही, काँग्रेस पक्षाला.. जनतेचे पैसे तुम्ही टॅक्स रुपात घेतात मग आम्हाला हे मान्य नाही. मी काल नागपूर मेडिकल कॉलेज येथे भेट दिली. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून घेतलेले त्यावेळी सेक्युरिटी गार्ड तिथे फसवा फसवी करत आहेत. यावर डीन असे म्हणतो साहेब ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. काय थट्टा चालवली आहे सरकारने असा सवाल देखील पटोले यांना केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube