World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचे दमदार पुनरागमन; श्रीलंकेला 209 धावांत गुंडाळले

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचे दमदार पुनरागमन; श्रीलंकेला 209 धावांत गुंडाळले

AUS vs SL: लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघ जुन्या फॉर्ममध्ये दिसला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने एक विकेट गमावून 157 धावा केल्या होत्या, परंतु कांगारूंनी जोरदार पुनरागमन करत संपूर्ण संघ 209 धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

एकेकाळी एका विकेटवर 157 धावा करणारा श्रीलंकेचा संघ अवघ्या 209 धावांत गडगडला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत श्रीलंकेच्या शेवटच्या 9 खेळाडूंना केवळ 52 धावा देऊन बाद केले. श्रीलंकेसाठी सलामीवीर कुसल परेरा 78 आणि पथुम निसांका 61 यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Video: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूल कोसळला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शानदार सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला
125 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. 157 धावांवर दुसरी विकेट पडली आणि त्यानंतर श्रीलंकेचा संघ पत्त्यासारख्या कोसळला. यादरम्यान कर्णधार कुसल मेंडिस 09, सदिरा समरविक्रमा 08, धनंजय डी सिल्वा 07, डुनिथ वेललागे 02 आणि चमिका करुणारत्ने 02 धावा करून बाद झाले.

Video: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूल कोसळला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मात्र, चरित असलंका दुसऱ्या टोकाला खंबीरपणे उभा राहिला, पण त्याला एकाही फलंदाजाने साथ दिली नाही. शेवटी तोही एका षटकाराच्या मदतीने 39 चेंडूत 25 धावा करून झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पा हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 48 धावांत चार बळी घेतले. याशिवाय पॅट कमिन्सने 32 धावांत प्रत्येकी दोन आणि मिचेल स्टार्कने 43 धावांत दोन बळी घेतले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube