विधानसभेत कॉंग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार; पटोलेंनी स्पष्टच सांगितलं…

विधानसभेत कॉंग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार; पटोलेंनी स्पष्टच सांगितलं…

Nana Patole On Opposition Leader : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. यापूर्वी हे पद राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे होते. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह वेगळा गट स्थापन करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे. विधानसभेत शिवसेनेचे (UBT) केवळ 15 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडेही 15 ते 20 आमदार आहेत. त्यामुळे आता काँग्रेसकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते. मात्र काँग्रेसने अद्याप विरोधी पक्षनेता निवडलेला नाही. दरम्यान, या संदर्भात आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य केलं. (Nana Patole On Opposition Leader they said Congress will be the Leader of the Opposition in the Legislative Assembly)

महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या बैठकीत काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्यात विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता होती. आता या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेतेपदाबाबत प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले की, विधीमंडळाची एक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेनुसार, विधिमंडळात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. सध्या विधानसभेत विरोधी पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होणार आहेत. लवकरच त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पुढील आठवड्यात याबाबतचं चित्र स्पष्ट होईल, आणि तुम्हाला विरोधी पक्षांचा नेता पाहायला मिळेल, असे पटोले म्हणाले.

लुटलेले सोने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला 

पुढे बोलतांना पटोले म्हणाले, 5 ऑगस्टनंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांचे दौरे सुरू होतील. इंडियामध्ये जागा कशा वाटता येतील याबाबत प्रत्येक पक्ष आपला अभ्यास करत आहे. निवडणुकीला अजून वेळ आहे, त्यामुळे तोपर्यंत हे काम पूर्ण होईल.मात्र, एनडीए विरुध्द इंडिया ही आमची भूमिका आहे. कारण, भाजप ज्या प्रकारे देशाला लुटत आहे. देशाला गरीब बनवत आहे, त्याविरोधात ताकदीनं लढण्याचं इंडियानं ठरवलं, असं पटोले म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube