मविआच्या लोकसभा जागा वाटपाचा नाना पटोलेंनी सांगितला प्लॅन; कोणाला किती जागा मिळणार?

मविआच्या लोकसभा जागा वाटपाचा नाना पटोलेंनी सांगितला प्लॅन; कोणाला किती जागा मिळणार?

Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)लोकसभा जागावाटपावरुन (Lok Sabha Seat Allocation)रणकंदन सुरु आहे. कोणाला किती जागा मिळणार यावरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्यासाठी मविआच्या बैठका सुरु झाल्या आहेत. त्यातच प्रत्येक पक्ष आपापल्या स्वतंत्र बैठका देखील घेत आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची (Congress Core Committee) आज बैठक पार पडली. या बैठकीला कॉंग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते. नाना पटोलेंनी आगामी काळातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांचं प्लॅनिंग कसं केलं जाणार याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्नीच्या घरी अन् ऑफिसला जायचे नाही : मारहाण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दम; पोलिसांनाही दिल्या सूचना

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवरील कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रामध्ये दोन तीन दिवसांपूर्वी वातावरण निर्माण केलं होतं, कोणी आमच्या एवढ्या जागा तेवढ्या जागा सांगत होतं. आम्ही सांगितलं आहे की, मेरिटप्रमाणं निर्णय व्हावा, कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की, या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या दैवतांचा अवमान करण्याचं काम संविधानिक पदावर बसून राज्यपाल पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अवमान करण्याची मानसिकता जी भाजपच्या मानसिकतेमुळे झाली.

अर्ध्या डझनपेक्षा अधिकपेक्षा जास्त मंत्र्यांनी महापुरुषांचा अवमान केला आहे. महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे, शेती, उद्योग ही सगळी व्यवस्था संपवण्यासाठी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की, मेरीटच्या आधारे जागावाटप व्हावं, 2014 मधील परिस्थिती वेगळी होती, 2019 मधील परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदललेली आहे. जागा कोण जास्त घेतो किंवा कमी घेतोस, हे नाही तर भाजपला त्या त्या भागात कोण परास्त करु शकतो, त्याच्याआधारावर हा निर्णय व्हावा, असंही नाना पटोले म्हणाले.

त्या पार्श्वभूमीवर येत्या दोन, तीन तारखेला महाराष्ट्र प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक नेत्याला बोलावून, नेते, आजी-माजी खासदार आमदार, प्रमुख नेत्यांना सगळ्यांना मुंबईत बोलावून आढावा घेणार आहेत. एक सर्वे आम्ही करण्यास सांगितला आहे. त्याच्यावर जो रिपोर्ट येईल त्याच्या आधारावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये प्रस्ताव ठेवला जाईल. त्याआधारावर सगळ्यांच्याच सहमतीने मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याची भूमिका कॉंग्रेस पक्षाची आहे. मला वाटतं त्याला कोणाचा विरोध असण्याची गरज नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक स्वबळावर लढवणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर नाना पटोले म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं दोन वर्षांपूर्वीच आम्ही सांगितलं आहे की, जिथं जिथं जी परिस्थिती असेल, मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषदा असतील त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असंही यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube